कराड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – ५ घरफोड्या उघड, १४.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड, :प्रतिनिधी
कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सलग प्रयत्नांतून घरफोडीचे ५ गुन्हे उघड करत १४ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सुमारे १८.५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

फेब्रुवारी ते जुलै २०२५ या कालावधीत मलकापूर, कोयना वसाहत व कार्वेनाका परिसरात दिवसा झालेल्या घरफोड्यांच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित यशवंत प्रकाश काटवटे (रा. आगाशिवनगर झोपडपट्टी, मलकापूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या अल्पवयीन मुलीसोबत मिळून घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त केले असून विधीसंघर्षित बालिकेला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चालू महिन्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकूण २७.१ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करून ६ घरफोडी गुन्ह्यांची उकल केली आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात मसपोनि श्रध्दा आंबले, मसपोनि तब्बसुम शादीवान, पो.उपनिरीक्षक सतिश आंदेलवार, निखिल मगदुम, पो.हवा संदीप कुंभार, पो.ना संतोष पाडळे, सज्जन जगताप, अनिल स्वामी, धिरज कोरडे, संग्राम पाटील, आनंदा जाधव, अमोल देशमुख, दिग्विजय सांडगे, मोहसिन मोमीन, मुकेश मोरे, प्रशांत वाघमारे, महेश पवार व सोनाली पिसाळ यांचा समावेश होता.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *