व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) कोल्हापूर प्रतिनिधी
फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापी ठाला अंतराळ क्षेत्रातील संशोधनासाठी संपूर्ण जगातून एकाच विद्यार्थिनीला 14 लाखाची शिष्यवृत्ती द्यायची होती.याबाबत उत्कृष्ट प्रबंध लिहिला म्हणून निवड झाली ती चक्क कोल्हापूरमधील हातकणंगले जवळील ‘हलोंडी ‘ या गावच्या अनिशा अशोक राजमानेची. येत्या जून महिन्यामध्ये अनिशा दोन महिन्यांसाठी अंतराळ क्षेत्रात संशोधन करण्यासाठी नेदरलँडला जाणार आहे. एके काळी कोल्हापूर प्रसिद्ध होतं ते कुस्तीसाठी.त्यानंतर वीरधवल खाडेने जलतरण क्षेत्रात कोल्हापूरचं नाव गेली काही वर्षे दुमदुमत ठेवलंय. अशा वेळी कोल्हापूर बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात पण अंतराळ भरारी घेणारं ठरलंय ते अनिशा राजमाने मुळे.एका शेतकऱ्याची मुलगी असलेली अनिशा केवळ कल्पना चावलाच्या कर्तृत्वाने भारावून जाते आणि अंतराळ क्षेत्रात अभ्यास करायला कोणत्याही सोयी सुविधा नसताना त्या क्षेत्राचा अभ्यास करते आणि फ्रान्स तर्फे दिली जाणारी कल्पना चावला शिष्यवृत्ती मिळवते ही निश्चितच असामान्य घटना म्हणायला हवी.
अनिशाने प्रॉ डक्शन इंजिनिअरिंग मध्ये आपले पूर्व शिक्षण घेतले आहे. आता ती सायबर कॉलेजमधून एमबीए करतेय.नासामधून पुढील प्रशिक्षण घेऊन आपल्या देशात अंतराळ संशोधन करायचं अनिशाचं स्वप्नं आहे. अनिशा राजमानेची ही कहाणी महाराष्ट्रातील लाखो मुलींना नक्कीच प्रेरणा देणारी आहे.आपल्या सर्व अडचणींवर मात करून मराठी पताका अटकेपार रोवणाऱ्या अनिशा राजमानेचं सर्वांकडून खूप खूप अभिनंदन होत आहे.तिच्या भावी कार्य कर्तुत्वाला वीरशैव लिंगायत समाज संघटना इतर सामाजिक संघटना व मान्यवरांकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. देण्यात येत आहेत