कादवा -शिवार प्रतिष्ठानचा हेडाम ह्या बहुचर्चित कादंबरीस पुरस्कार जाहीर*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
 म्हसवड
               हेडाम ह्या बहुचर्चित कादंबरीस कादवा शिवार पालखेड बंधारा  नाशिक येथील मानाचा समजला जाणारा स्व .चंद्रकांत महामनी उत्कृष्ट वाडःमय  निर्मिती चा रोख रक्कम  5100 रू चा पुरस्कार जाहीर झाल्याचे सचिव मा.विठ्ठलराव संधन यानी सांगीतले. नागु विरकर यांची  रोज नवगावनवी चूल करत फिरणाऱ्या मेंढपाळांच्या जीवनावर आधारित आत्मकथनात्मक कादंबरी सध्या साहित्यीक वर्तुळात चर्चेत आहे. ह्या कादंबरीच्या आठ महिन्यांतच दोन आवृत्या संपल्या आजून तिसरी आवृत्ती प्रकाशीत होत,आहेत…तिचेही बुकींग मोठ्या प्रमाणात झाले आहे…आतापर्यंत मुक्तसृजन साहित्यी पत्रिकेचा एक राष्ट्रीय पुरस्कार तर तीन राज्य पुरस्कार भेटले आहेत. सदर कादंबरीवर कोणत्याही लेखन साहित्याचा प्रभाव नसुन ती वेगळीच साहित्यीकृती झाल्यामुळे वाचकाचया मनाचा ठाव घेते.कॅनडा,सौदी आरब राष्ट्रात कादंबरी पोहचली आसून इंग्रजी व कन्नड भाषेत अनुवादित होत आहे.
          या बरोबरच अशोक लोटणकर याच्या ‘अक्षरनामा’ काव्यसंग्रहास तर अशोक कुबडे याच्या गोंडर कादंबरीस व काशिनाथ माटल याच्या खेळ माडीयाला या कथासंग्रहास पुरस्कार जाहीर झाले आहेत.
           नागु विरकर हे पालघर येथे केंद्रप्रमुख पदावर कार्यरत आसून ते मुळचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड गावचे रहिवाशी आहेत. त्यांचे प्रतिष्ठानचे पदाधिकारी साहित्यीक, वाचक वर्गातून सरवत्र कौतुक होत आहे…

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!