बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते सातारा फलटण

हनुमंतराव चव्हाण संपादक साप्ताहिक लोहसंस्कार मुळे समाजातील विविध भागांचा आढावा घेतला जातो त्याच प्रकारे समाजात घडणाऱ्या मुलांचे निकाल व त्यांचे प्रसिद्धी यांच्यामार्फत होते व व त्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम लोह संस्कार या साप्ताहिकांमुळे झाले असे यावेळी दीपक रावजी चव्हाण यांनी सांगितल.

     त्याच प्रकारे लोहार समाजाला एकत्र आणण्याचे काम हनुमंतराव चव्हाण हे गेले कित्येक वर्ष करत आहे असे कौतुकास्पद दीपक रावजी चव्हाण आमदार यांनी सांगितले. कोणत्याही समाजामध्ये एकी असल्याशिवाय समाज पुढे जात नाही एकी दाखवत असेच एकत्र रहा व आम्ही नेहमी तुमच्या सोबत असू असे कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.
लोहार महामंडळाला आता सरकारने परवानगी दिल्याने अतिशय आनंदाची बाब आहे तरी महामंडळ स्थापन करताना सर्वांनी एकत्र येऊन योग्यरीत्या सर्व गोष्टी कराव्यात असेही यावेळी सांगितले.
लोह संस्कार साप्ताहिकाच्या अकरावा वर्धापन दिनानिमित्त समाजभूषण पुरस्कारार्थी देण्यात आले रवींद्र राजाराम पवार कोल्हापूर, शंकर भानुदास पवार म्हासुर्णे नितीन ज्ञानेश्वर नवगण कातर खटाव विलास गोरख थोरात कर्जत, मिलिंद मारुती लोहार पत्रकार सातारा यांची भटका शोषित समुदाय संघर्ष संघटना बी एस फोर महाराष्ट्र जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड तसेच दैनिक ऐक्य पत्रकार व समाजात अनेक कार्य यामुळे यांना देखील विशेष सामाजिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस व माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा आमदार दीपक रावजी चव्हाण आमदार फलटण कोरेगाव मतदार संघ, हनुमंतराव चव्हाण अध्यक्ष सुरेश माने उपाध्यक्ष सुरेश चव्हाण सचिव मारुती पवार दादासो चव्हाण सचिन चव्हाण नामदेव चव्हाण शंकर पवार पांडुरंग लोहार प्रशांत चव्हाण मंगल पवार सुमन वसव राजाराम वसव भगवान हरिहर विजय पवार सकल लोहार समाज विकास मंच सातारा कोळकी तसेच सकल लोहार समाज विकास मंच फलटण तालुका अमोल हरिहर नवनाथ थोरात बाळासाहेब प्रकाश पवार राजेंद्र थोरात राजेंद्र पवार अमोल थोरात हनुमंत हरिहर पंढरीनाथ पवार ज्ञानदेव हरिहर दिलीप हरिहर सुरेश पवार दिनकर वजह राहुल पवार किरण हरिअर युवराज पवार उपस्थित होते
तसेच कोरेगाव कार्यकारणी मधील नवनाथ पवार अध्यक्ष वैशाली पवार उपाध्यक्ष अशोक माने कार्याध्यक्ष उपस्थित होते


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!