रूबी हाॅल मधून आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचे हस्ते कॅलेंडर प्रकाशन

भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आ. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांचा भीषण अपघात झाला. आणी गेली आठ दिवसापासून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल मध्ये उपचार सरु आहेत अशा परिस्थितीत सुद्धा आज हॉस्पिटल मधून आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी इंजि.सुनील पोरे यांच्या जनश्री फौंडेशन कॅलेंडरचे प्रकाशन केले .
आमदाराचे आपल्या कार्यकर्त्यावर असणारे प्रेम व कार्यकर्त्यांचे आपल्या नेत्यांवरील प्रेमाची प्रचीती आज दिसून आली म्हसवड येथील इंजि.सुनील पोरे, अध्यक्ष असलेल्या जनश्री फौंडेशन च्या कॅलेंडरचे प्रकाशन थेट रूबी हाॅल रूग्णालयातून आमदार गोरे भाऊ यांचे हस्ते करण्यात आले याबाबत मिळालेली अधिक माहीती अशी कि म्हसवड येथील पोरे कुटुंबीय दर वर्षी प्रसिद्ध करीत असलेल्या कॅलेंडरचे कायम प्रकाशन आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचे हस्ते करीत असतात या वेळी गोरे भाऊचा भीषण कार अपघात होऊन त्यांना रुबी हॉस्पिटल मध्ये अडमिट करण्यात आले लाखो कार्यकर्ते भेटण्यासाठी येत होते पण रुग्नालयातील नियमामुळे सगळ्यांना भेटने अशक्यच होते तथापि इंजि.सुनील पोरे यांनी नेत्यांवरील श्रद्धेपोटी त्यांची भेट घेऊन आपली कॅलेंडर प्रकाशनाची इच्छा गोरे भाऊ यांचेकडे व्यक्त केली त्याचक्षणी रुग्णालयातील नियमांची पर्वा न करता व्हील चेअरवरून कॅलेंडरचे प्रकाशन करून कार्यकर्त्याचे इच्छेचा मान राखून कार्यकर्ता कसा सांभाळावा याचा संदेश आजच्या समस्त नेत्यांना दिला. यावेळी सौ सोनिया गोरे,भाजप ओबीसी युवक मोर्चा प्रदेशाध्यक्ष करण पोरे, इंजि.सुनील पोरे, माणदेशी फौंडेशन चे करण सिन्हा,आदित्य गोरे आदि उपस्थित होते…