आ.जयकुमार गोरेभाऊ यांच्या आमदार फडातून वडुज येथे नामदेव मंदिरासाठी १० लाख रुपये मंजूर …
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड /वडूज
वडूज (जिल्हा सातारा) येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज मंदिराच्या बांधकामासाठी १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी आमदार जयकुमार गोरे यांनी आपल्या आमदार फडातून उपलब्ध करून दिला आहे.
या मंदिराच्या बांधकामासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नामदेव समाजोत्रती परिषदेचे जिल्हाध्यक्ष आणि अभियंता सुनील पोरे यांनी दिले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि वडूज येथील समाजबांधवांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे.


