जयकुमार गोरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे : मुरलीधर मोहोळ

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड –

माण खटाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
माण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हसवड येथे पदयात्रेच्या समारोपानंतर बोलताना व्यक्त केले.

     यावेळी महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे, भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, सिध्दनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, विजय धट, नितीन दोशी, वैशाली लोखंडे, धनश्रीदेवी राजेमाने,आदित्य गोरे,अकील काझी,आप्पासाहेब पुकळे, इंजि.सुनिल पोरे, सोमनाथ केवटे, रविंद्र विरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी बोलताना आ. जयकुमार गोरे म्हणाले कि श्री सिध्दनाथ आशिर्वाद आपल्या सोबत आहेत प्रचाराचे शेवटचे दोन दिवस बाकी आहेत रस्त्यावरील लढाई आता संपली असून हि लढाई कार्यकर्त्यानी घरा घरात जाऊन आपली भूमिका सांगावी व लोकांचे आशिर्वाद मागून माता भगिनी व बांधवांचे आशिर्वाद भारतीय जनता पार्टीसाठी व माझ्या साठी मागावेत असे आवाहनही यावेळी केले. आजवर म्हसवडकरांनी माझ्या प्रेम केले तसेच यावेळेस ही सध्याचे शहरातील वातावरण बघुन येथील जनतेचे आशिर्वाद व प्रेम उच्चांकी मिळतील याची मला खात्री आहे तसेच या विधानसभा निवडणूकीतील मानाचा कळस म्हसवडकर जनता चढवणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.


केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील महात्मा फुले चौकातुन पदयात्रेत उत्साहात सुरुवात करण्यात आली तेथून बसस्थानक चौक, सातारा पंढरपूर महामार्गावरुन पंढरपूर नाका, मुख्य पेठेतून शिवाजी चौक, श्री सिध्दनाथ मंदिर, रिंगावण पेठ बायपास मार्ग पुन्हा महात्मा फुले चौक अशी पदयात्रा काढण्यात आली त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!