जनश्री फाउंडेशन म्हसवड यांच्या दिनदर्शिकेचे दहिवडी येथे आमदार जयकुमार गोरे व सोनिया गोरे यांच्या हस्ते प्रकाशन
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
जनश्री फाउंडेशन म्हसवड यांच्या दिनदर्शिकेचे दहिवडी येथे आमदार जयकुमार गोरे व सोनिया गोरे यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ करण्यात आला.
म्हसवड येथील इंजिनियर सुनील पोरे यांच्या जनश्री फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते या दिनदर्शिकेचे प्रकाशन दहिवडी येथे माण तालुक्याचे लाडके आमदार जयकुमार गोरे व त्यांच्या सुविधे पत्नी सोनिया गोरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.
यावेळीला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या युवा नेते करण भैया पोरे, अँड शुभम भैय्या पोरे, युवा नेते सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
इंजिनीयर सुनील पोरे साहेब यांनी माण तालुक्यातील जनतेला सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवून नवी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे भविष्य काळामध्ये सुनील गोरे यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती या वेळेला आमदार जयकुमार गोरे यांनी बोलताना दिली आहे
या वेळेला इंजिनियर सुनील पोरे यांनी विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.
जनश्री फाउंडेशनच्या माध्यमातून माण तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिर तरुणांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा त्याचप्रमाणे रुग्णांसाठी रुग्णवाहिका व कोविड काळामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना आर्सेनिक अल्बम गरजवंतांना शिधावाटप तसेच रुग्ण उपचारासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून दिले असून या माध्यमातून सामाजिक सेवेचे व्रत जपलेला आहे अशी माहिती इंजिनियर सुनील पोरे यांनी या वेळेला दिलेली आहे
आभार प्रदर्शन एडवोकेट शुभम भैय्या पोरे यांनी केले