प्रवाशांच्या सेवेसाठी जमातुल मुस्लिम संस्था म्हसळा वतीने पाणपोईची सुविधा

बातमी Share करा:

व्हिजन २४तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )

सुशील यादव
रायगड
म्हसळा- प्रतिनिधी :

तालुका शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एस टी स्थानक म्हसळा येथे प्रवाशी वर्गाची येणाऱ्या उन्हाळी हंगामात तहान भागवण्यासाठी जमातुल मुस्लिम संस्था म्हसळा संस्थेच्या वतीने पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे.

     आयोजित सामाजिक लोकपयोगी स्तुत्य उपक्रमाचे शुभारंभाचे कार्यक्रमाला जमातुल मुस्लिम म्हसळा सचिव साजिद हुर्जुक,शुएब घराडे,शौकत घरटकर,मुनीर जमादार,फारुक डोसानी, बुरहान वसगरे,नईम दळवी,मुजीब साने,अभय कळमकर,मनोहर तांबे,अकमल कादरी,शहजाद लांबे, शाहनवाज उकये आदी मान्यवर आणि प्रवासी उपस्थित होते.

       मुस्लीम बांधवांनी म्हसळा शहरात रोजच्या रोज बाजारापेठेत येणाऱ्या स्थानिक,पर्यटक व ग्रामीण भागातील नागरीकांना पिण्याचे पाण्याची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेऊन शुद्ध आणि थंड पाण्याचे जारच्या साह्याने पाणपोईची सुविधा केली आहे.नागरीकांचे मागणी नुसार अन्य कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गरज भासल्यास संस्था पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात येणार असल्याचेजमातुल मुस्लीम संस्थेच्या उपस्थित पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!