जलनायक जयकुमार गोरे यांचा कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांकडून सत्कार

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

नागपूर, १६ डिसेंबर:
माण-खटाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि जलसंपदेत मोलाची कामगिरी करणारे जलनायक जयकुमार गोरे (भाऊ) यांनी आज राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या या यशस्वी प्रवासानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नागपुरात जाऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांचा सत्कार केला.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे माण तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, सातारा जिल्हा परिषद माजी सदस्य प्रा. बंडा गोडसे, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष किसनशेठ सस्ते, माण तालुका अध्यक्ष गणेशशेठ सत्रे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, युवानेते लुनेश विरकर, करण पोरे, विलासराव देशमुख,बाळासाहेब पिसे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. वडूज नगरसेवक सोमनाथ जाधव, ओंकार चव्हाण, गणेश गोडसे आणि श्रीकांत काळे पाटील यांसह राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मंत्री महोदयांचे अभिनंदन केले.

 

जयकुमार गोरे यांनी मंत्रीपदाच्या माध्यमातून राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी झटण्याचा निर्धार व्यक्त केला. “राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहीन,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!