जय भवानी विद्यामंदिर क्रमांक 11 शाळेमध्ये सलाम मुंबई फाउंडेशन मार्फत तंबाखू मुक्त स्वच्छ आरोग्य सत्र संपन्न
व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोदवले –
सलाम मुंबई फाउंडेशन,जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर व सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त,स्वच्छ, आरोग्य संपन्न शाळा आणि परिसर कार्यक्रम इचलकरंजी मधील पन्नास शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.या उपक्रमा अंतर्गत जय भवानी विद्यामंदिर क्रमांक 11 या शाळेमध्ये एकूण 5 सत्र घेऊन विद्यार्थ्यांना आरोग्यमय जीवन जगता यावे यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन मार्फत सत्र घेण्यात येत आहे.
सत्र क्रमांक १ आरोग्याचा पहिला धडा,तंबाखूला नाही म्हणा यामध्ये विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम विषयी माहिती देणे,त्यानंतर तंबाखू मुक्तीसाठी गाव पातळीवर विविध उपक्रम राबवणे.
सत्र क्रमांक २. कोटपा २००३ कायद्याचे पालन करू,आपले परिसर तंबाखूमुक्त ठेवू यामध्ये विद्यार्थ्यांना तंबाखू नियंत्रण कायदा कोटपा २००३ मधील महत्त्वाची कलम विषयी माहिती देणे त्यानंतर तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी कोणकोणते निकष आहेत त्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना देणे.
सत्र क्रमांक ३ .मी स्वच्छ, मी बलवान, आजारापासून राहू चार हात लांब यामध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छते विषयी माहिती व त्यामधील योग्य व अयोग्य पर्याय निवडणे आणि त्या विषयी माहिती देणे, ब्रश करण्याची कोण कोणती योग्य पद्धत आहे,पौष्टिक आहार असणारे व नसणारे अन्नपदार्थ ओळखणे याविषयी माहिती देणे,हात कधी व कसे धुवायचे याविषयी मुलांना प्रात्यक्षिक करून दाखवणे
सत्र क्रमांक४ परिसर स्वच्छ व सुंदर ठेवूया,मातृभूमीची शान वाढवूया यामध्ये विद्यार्थ्यांना साफसफाई विषयी माहिती देणे,वर्तमानपत्रापासून कचराकुंडी बनवणे,स्वच्छता आणि अस्वच्छता मधील फरक विषयी माहिती सांगणे,एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने या विषयी माहिती देणे.
सत्र क्रमांक५ .सकस संतुलित आहार घेऊ,आपले कुटुंब खुशाल ठेवू ,यामध्ये विद्यार्थ्यांना रोज कोण कोणते अन्नपदार्थ खाण्यास दिले पाहिजेत कोणत्या पदार्थांमध्ये कोणते जीवनसत्व असतात याविषयी माहिती देणे.व्यायाम विषयी माहिती देणे.दररोज पाणी पिणे आणि त्याचे फायदे काय आहेत याविषयी माहिती विद्यार्थ्यांना देणे.
असे अनेक उपकरण घेऊन विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन मार्फत काम करण्यात येत आहे या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्यासाठी, आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी,स्वच्छते विषयी आवड निर्माण होण्यासाठी जनजागृती चे काम शाळेमध्ये करण्यात येत आहे.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तंबाखूमुक्त शाळेचे जिल्हा समन्वयक व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे (अध्यक्ष) श्री रवींद्र कांबळे यांनी दिली.सदर कार्यक्रमास तंबाखू शाळेचे जिल्हा समन्वयक सौ ज्योती राजमाने, सौ सुवर्णा जंगम केंद्र मुख्याध्यापिका,शिक्षिका सुवर्णा वाडकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री लक्ष्मण काबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री प्रकाश पाटील यांनी मानले.सदर कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी सौ ज्योती राजमाने यांनी परिश्रम घेतले