व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसळा – सुशील यादव
जल जीवन मिशन योजने अंतर्गत श्रीवर्धन मतदार संघात खासदार सुनिल तटकरे आणि श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार तथा महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील गाववाडी वस्तीतील छोटया मोठया लोकवस्तीचे नागरीकांना पिण्याचे स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करणेसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातुन किमान दोन ते अडीच कोटी रुपये मंजुर केले आहेत.योजना मंजुर करून दोन ते अडीच वर्षे झाली तरी म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांतील अनेक गावांतील पाणी पुरवठा योजना कामास संबंधीत ठेकेदारांनी ढुंकूनही पाहिले नाही.
अनेक गावांतील झालेली कामे अर्धवट अवस्थेत तर अनेक गावांतील कामे नित्कृष्ट दर्जाची झाली आहेत.अनेक गावांतील योजनेला पाण्याचे उद्भवच नाही तर काही ठिकाणी हेवेदावे असल्याने योजनांचे काम रखडले आहे.मंजुर योजनांचे काम वेळीच सुरू व्हावे आणि लोकांना पाणी पुरवठा व्हावा अशी खासदार,आमदार, मंत्री तटकरे यांची अपेक्षा असल्याने मंजुर योजना करण्यास अडचण काय या बाबत दिनांक १४ मार्च २०२४ रोजी पालक मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा पंचायत समिती येथे आढावा बैठक घेतली असता योजनेच्या कामांत त्यांना एक ना धड भाराभर चिंध्या निदर्शनास आल्या.पैशाच्या हव्यासापोटी ठेकेदारानी मोठ मोठ्या रकमेच्या आणि आवाक्याच्या बाहेर योजनेच्या निविदा घेतल्या असल्याचे निदर्शनास आले.आढावा बैठकीला म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील विविध गावाचे ग्रामस्थ,सरपंच आणि योजना समितीचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे ठेकेारांकडून मंजुर योजनांचे काम कशा प्रकारे केले जात आहे याचा पाढा वाचला असता नित्कृष दर्जाची आणि कामच करीत नसणाऱ्या ठेकदरांचे कामांचा ठेका रद्द करून तत्काळ फेर निविदा काढण्यात याव्या अशा सूचना व आदेश मंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा परिषद पाणी पुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे यांना दिले आहेत.येत्या दोन चार दिवसांत योग्य कारवाई करावी अशी सक्त ताकीद मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकारी वर्गाला दिल्या आहेत.आयोजीत आढावा बैठकीला प्रांताधिकारी महेश पाटील,तहसीलदार समीर घारे,पाणी पुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे,तालुका अभियंता फुलपगारे,नाबार्डचे श्री बिराजदार,मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अभियंता श्रीमती देशमुख,श्रीमती आवारे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,महीला अध्यक्षा सोनल घोले,मिना टिंगरे, शागुप्ता जहांगिर,प्रकाश रिकामे,नाना सावंत,संदिप चाचले,किरण पालांडे,महेश घोले,म्हसळा- श्रीवर्धन तालुकयातील सरपंच,योजनेचे ठेकेदार,लोकप्रतिनिधी आणि पाणी पुरवठा योजना समितीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा येथे घेतला पाणी पुरवठा योजना कामांचा आढावा.
* नित्कृष्ट आणि काम करीत नसणाऱ्या ठेकदरांचे कामांचा ठेका रद्द करून फेर निविदा काढण्यात याव्यात मंत्री आदिती तटकरे यांनी दिले अभियंता युवराज गांगुर्डे यांना सक्त आदेश.