राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शहीद जवान सैनिक यांना उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही याची खंत वाटते अशा भावना खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी कराड भेटी दरम्यान व्यक्त केल्या राज्याचे मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्याचे आहेत सातारा जिल्हा हा शूरवीर जवानांचा जिल्हा आहे या जिल्ह्याने देश सेवेसाठी अनेक जवान दिले आहेत प्रसंगी सीमेवर लढताना जवान शहीद ही झाले आहेत सैनिकांना व शहीद जवानांच्या कुटुंबियांना येणाऱ्या समस्या सोडविणे हे प्रशासनाचे काम आहे दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांना जवानांना सैनिकांना येणाऱ्या समस्यांसाठी एकही मीटिंग न घेतल्याची खंत वाटते अशा भावना शनिवार दि.१७ रोजी खासदार ब्रिगेडियर सुधिर सावंत (नि.) अध्यक्ष सैनिक फेडरेशन यांनी कराड येथील भेटी दरम्यान व्यक्त केल्या,
भेटी दरम्यान आजी /माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय यांच्या समस्या, अडचणी सोडवणे व शासन/ प्रशासन दरबारी प्रलंबित विषयी चर्चा व सातारा जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय घडामोडींवर प्रदीर्घ चर्चा झाली.
या सर्व विषयावर पुढील थोड्या दिवसामध्ये सैनिकांचे महा अधिवेशन घेतले जाईल व त्या मध्ये सर्व राजकीय,सामाजिक, व संघटनात्मक निर्णय घेण्यात येतील अशी चर्चा झाली. व .सावंत साहेबांनी स्वतः म्हटले की सैनिकांचे प्रश्न शासन/ प्रशासन सोडवत नसेल तर मी सैनिकांसाठी तिरंगा ध्वज हातात घेऊन रस्त्यावर उतरण्याची भुमिका आहे हे स्पष्ट केले. व देशातील व महाराष्ट्रातील सरकार हे सैनिक व त्यांच्या परिवाराच्या समस्या व खास करून शहिद सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी गांभीर्याने लक्ष देत नाही.त्यांचे अडचणी वर्षांनी-वर्ष प्रलंबित आहेत.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी सैनिकांच्या समस्या संदर्भात एक ही मीटिंग आज पर्यंत बोलवली नाही याचे फार दुःख वाटते. त्यामुळे जे सर्व माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय “सैनिक महा अधिवेशनात” जे निर्णय घेतील त्या बरोबर माझी भुमिका राहील अशी भुमिका स्पष्ट विचार या भेटी दरम्यान व्यक्त केले दरम्यान यावेळी सैनिक फेडरेशन चे सन्मान चिन्ह देऊन . खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत अध्यक्ष सैनिक फेडरेशन व . सरदार चोपडे सचिव सैनिक फेडरेशन यांचा सन्मान सातारा जिल्हयातील सैनिक फेडरेशन सर्व पदाधिकारी आजी/माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय यांचे वतिने सातारा जिल्हा अध्यक्ष यांनी केला.
या प्रसंगी श्री प्रशांत कदम (माजी सैनिक) अध्यक्ष सैनिक फेडरेशन सातारा जिल्हा,श्री. सदाशिव नागणे अध्यक्ष कराड तालुका सैनिक फेडरेशन,.प्रदीप घोलप माजी सैनिक,.विजय माळी मा.सरपंच माजी सैनिक पुत्र उपस्थित होते.