जगात अशांतता असताना आपण भारत देशात जन्माला आलो हे आपले भाग्य – ह.भ.प.शिरीष महाराज म्हसळयात हिंदु धर्म जागरण मेळाव्याला लोटला अथांग जन सागर
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसळा – रायगड
आजच्या घडिला जगात अशांतता निर्माण झाली आहे.ज्या देशांत लोक भाकरीच्या पिठाला मुकले आहेत,ज्या देशांमधुन पंतप्रधानांना देश सोडुन पळून जावे लागते.ज्या देशात अशांतता आहे अशा देशात जन्माला येण्या पेक्षा सनातन आणि सर्वधर्म समभाव आसलेल्या संत महतांच्या भारत देशात जन्माला आलो हे आपले भाग्य असल्याचे संत तुकाराम यांचे ११ वे वंश असलेले हभप शिरिष मोरे महाराज यांनी म्हसळा तालुका शहरात आयोजीत भव्य हिंदु धर्म जागरण मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगीतले.
त्यांनी धर्म जागृती बाबत अनेक ठोड विषयांना हात घालताना तुम्ही कोणत्याही जातीचे असलात तरी आधी आपण हिंदु आहोत धर्माभिमान जोपासला पाहिजे.बटोंगे तो कटोंगे हा नारा राजकारणा पुरता मर्यादित सीमित नाही तर तो सातत्याने अंमलात आणला पाहिजे.जातींच्या भिंती बाजूला ठेवून हिंदु धर्मासाठी एक व्हायला पाहिजे.धर्मांतर,लव जिहाद,फूड जिहाद,ल्यांड जिहाद पासुन सावध रहा असा इशारा देण्यात आला.


