समाजाच्या न्याय व हक्कासाठी शिंपी समाज एक संघ असने गरजेचे :इंजि .सुनील पोरे : नासपच्या पाटण तालुका अध्यक्षपदी योगेश हिरवे, तर उपाध्यक्षपदी श्रीकांत फुटाणे यांची निवड
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
समाजाच्या न्याय व हक्कासाठी व शिंपी समाज एक संघ ठेवण्या करता संपूर्ण महाराष्ट्रभर नामदेव समाज परिषद काम करत असून सातारा जिल्ह्यामध्ये तालुका निहाय शिंपी समाजाची कार्यकारणी स्थापन करण्यात आली जिल्ह्यात सर्वत्र एकसंघ सकारात्मक प्रतिसाद मिळत असून पाटण तालुक्यातील समस्त नामदेव महाराज शिंपी समाजाच्या वतीने पाटण तालुक्याचीही कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून नामदेव समाज परिषदेच्या पाटण तालुका अध्यक्षपदी पत्रकार योगेश हिरवे, तर उपाध्यक्षपदी श्रीकांत फुटाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष इंजि .सुनील पोरे यांनी सांगीतले
मल्हारपेठ येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समाजाच्या नामदेव समाज परिषदेच्या पाटण तालुका कार्यकारणी ची बैठक संपन्न झाली यावेळी सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष इंजि .सुनील पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी समाजाच्या न्याय व हक्कासाठी व शिंपी समाज एक संघ ठेवण्या करता संपूर्ण महाराष्ट्रभर नामदेव समाज परिषद काम करत आहे
पाटण तालुका ओबीसी समाजामध्ये अनेक जातींधर्मांचा समावेश आहे मात्र काही ओबीसी समाजातील.नागरिकांना शासनाच्या काही योजनांचा लाभ मिळतॊ तर समाजातील काही घटकांचे नागरिक गावोगावी अल्पसंख्येत असतात यामुळे ओबीसी समाजाच्या अनेक कल्याणकारी योजना या नामदेव शिंपी समाजापर्यंत पोहोचतच नाहीत यामुळे राज्यस्तरावर नामदेव समाज परिषदेची वतीने समाजाच्या न्याय व हक्कासाठी सातारा जिल्हा नामदेव समाज परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि . सुनील पोरी यांच्या नेतृत्वाखाली काल पाटण तालुक्याच्या नियुकत्या करणेत आल्या यात पत्रकार योगेश हिरवे (मल्हारपेठ) यांची पाटण तालुका अध्यक्ष व श्रीकांत फुटाणे ( पाटण) यांची उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देवुन सन्मानित करणेत आले यावेळी कार्याध्यक्ष महेश हिरवे( ), सरचिटणीस विजय बारटक्के(तारळे) कोशाध्यक्ष नामदेव वनारसे (गारवडे) यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नामदेव शिंपी समाजाची मारुल हवेली तारळे पाटण चाफळ गारवडे मल्हारपेठ मोरगिरी येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते