लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणूकी पुरतीच ??
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते उंब्रज.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सूरु केलेली लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणूकी पुरतीच उरली का ?????? असा प्रश्न आता जनसामान्यात निर्माण झालेला आहे.!सुरुवातीला १५०० रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत होती, नंतर ती वाढवून युती सरकारने २१०० देणार असे आश्वासन दिले पण १५०० पण नाही आणि २१०० तर प्रश्नच उद्भवत नाही ,शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे ही योजना सूरु केली मात्र भाजप ची सत्ता आली की ही योजना परत बारगळल्याचे चित्र आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे निवडणूक सुरू आहे. नेत्यांकडून आश्वासनांची खैरात जनतेला दिली जाणार, लाडक्या बहिणींना परत उल्लू बनवले जाणार, केवायसी अपडेट करा कागदपत्रे जमा करा लाडक्या बहिणींची बँकेमध्ये हेलपाटे घालून दमछाक होत आहे.
.सत्ताधारी पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत लाडक्या बहिणीच्या नावाखाली मते मागितली जातात, पण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे का जमा होत नाहीत याबद्दल चकार शब्दही काढायला कोणी तयार नाही हे वास्तव आहे.
.. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्या पासून सतत काही न काही प्रॉब्लेम आणि वेगवेगळ्या नियमानुसार ही योजना बारगळत चालली आहे. दर महिन्याला एक नवा नियम सुरू आहे. गरजू महिलांना पैसे येणे बंद झाले आहे, .दर महिन्याला फक्त बहिणींना मिळते ते फक्त पोकळ आश्वासन , . २ ते ३ महिने झाले अजूनही शेकडो भगिनींना खात्यात पैसे आले नाहीत.या भगिनी बँकेत हेलपाटे मारून दमल्या.केवायसी कागदपत्रे पूर्तता पूर्ण केली. तरीही पैसे जमा झाले नाहीत.तसेच त्या बाबत कोणीही माहिती देण्यास तयार नाही.’लाडकी बहिण ‘ योजनेच्या मदतीसाठी अनेक पदाधिकारी नियुक्त केले होते.पण आता मात्र ते सर्व गायब झाले आहेत
ही योजना सुरळीत चालू करणे किव्हा गरजू बहिणींना या योजनेत पैसे मिळत नाही त्या मध्ये तांत्रिक अडचणी आहेत या येत असणाऱ्या अडीचणी बाबत भाजपा चे सत्ताधारी पक्षाचे आमदार उमेदवार पदाधिकारी लक्ष देणार काय ?????? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे
.निवडणूक आली की,योजनांचा पाऊस पाडला जातो आणि निवडणूक झाली की,या सर्व योजना गुंडाळून ठेवल्या जातात.असा आरोप महिलांच्या कडून केला जात आहे.त्यामुळे येऊ घातलेल्या मिनी मंत्रालय जि. प. व पं. स.निवडणूक मध्ये याचा नकारात्मक परिणाम दिसून आला तर नवल काय. साहजिकच .मुख्यमंत्री असताना एकनाथ जी शिंदे यांनी सुरू केलेली’ लाडकी बहिण’ योजना सध्याचे मुख्यमंत्री .देवेंद्र जी फडणवीस सुरळीतपणे चालू ठेवतील का ? अशी जोरदार चर्चा मात्र जनसामान्यांच्या त या निमित्ताने होत आहे

