म्हसवड यात्रापटांगणा जवळ नदीपात्रात बेकादेशिरपणे बांधलेल्या बंधाऱ्याची चौकशी व्हावी याकरीताअजिनाथ केवटे यांचे बेमुदत आंदोलन
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड यात्रापटांगणा जवळ नदीपात्रात माणदेश फौडेशनने बेकादेशिरपणे बांधलेल्या बंधाऱ्याची चौकशी व्हावी याकरीता सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी ३० आक्टोबर पासून महात्मा फुले चौकात बेमुदत आंदोलन सुरु केले आहे या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून त्याच्या आंदोलनास नागरीकांचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे
यात्रा पटांगणा जवळ नदीपात्रात माणदेश फौडेशनने बेकादेशिरपणे बांधलेल्या बंधाऱ्याबाबत जिल्हाधिकारी सातारा, जलसंपदा विभाग जिहे कटापूर उपसा सिंचन विभाग सातारा ,उपविभागीय अधिकारी माण-खटाव,तहसिल कार्यालय दहिवडी , यांना पाठवलेल्या निवेदनात अजिनाथ केवटे यांनी म्हटले आहे की,
माणगंगा नदी पात्रात म्हसवडच्या रथाजवळ माणदेशी फौडेशने बांधलेला बंधारा चुकीचा ठिकाणी बांधलेला आहे. या बंधा-याला गावाशेजारी शासनाने परवानगी दिली कशी ?. या बंधा-याजवळ श्री सिध्दनाथाची यात्रा भरते बंधा-यामुळे यात्रेला जागा कमी झाली आहे या यात्रेला अंदाजे ३ ते ४ लाख भाविक येत असतात. हे भक्त कर्नाटक, आंध्रप्रदेश, तसेच इतर बाहेरील राज्यातुन येत असतात. या बंधा-यालगत असलेले यात्रा पंटागणामध्ये श्री सिध्दनाथ यात्रेवेळी व्यवसायकाची सर्व प्रकारचे मिठाई दुकाने, पाळणे, इत्यादी मोठया प्रमाणात १५ ते २० दिवस असतात. चुकुन अवकाळी पाऊस आल्यास नदीला पुर आल्यास या बंधा-यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता आहे आणि तसे झाल्यास याला कोण जबाबदार राहणार आहे.
या बंधा-याचे वाहते पाणी बंद झाल्यावर यात म्हसवड मधील गटाराची संपुर्ण सांडपाणी जात आहे. त्यामुळे या बंधा-यामध्ये डांसाचे प्रमाण जास्त वाढते. व पाण्याचा उग्र घाण वास येत असतो. त्यामुळे या परिसरातील नागरीक व श्री सिध्दनाथाचे दर्शनासाठी येणारे भाविक रोगराईस बळी पडतात. या बंधा-यात आजपर्यंत बुडुन बऱ्याच जणांना जीव गमाववे लागलेआहेत. या गावाशेजारील धोकादायक बंधा-याचा आपण आपल्याकडील असणा-या कागदपत्राची पडताळणी करून हा बंधारा ज्यांनी बांधला आहे ते दोषी ठरल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी. व केलेल्या कारवाईची संपूर्ण माहिती २५ आक्टोंबर पर्यंत कळवावी अन्यथा ३० आक्टोंबर पासून बेमुदत आंदोलन करणार असल्याचे निवेदन अजिनाथ केवटे यांनी दिले होते त्यानुसार आज या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून त्याच्या आंदोलनास नागरीकांचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे