अंतरंग ललित लेखन पुस्तक प्रकाशन सोहळा गोव्यात संपन्न होणार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गोवा प्रतिनिधी

       लेखिका समीक्षा शिरोडकर यांनी लिहिलेले अंतरंग ललित लेखन पुस्तक प्रकाशन. सोहळा दिनांक 5 मे रोजी सायंकाळी 4 वाजता शिवस्मृती खेडेकर हॉल साखळी गोवा येथे संपन्न होणार.. आहे..

      गोव्यातील सामाजिक अभ्यासिका समीक्षा नागेश शेट शिरोडकर यांचे नुकतेच अंतरंग हे ललित लेखन पुस्तक प्रकाशन होणार आहे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत सध्या स्थितीमध्ये सामाजिक सांस्कृतिक वारसा सामाजिक प्रश्नावरती अंतरंग असं लिखाण त्यांनी केलं आहे मुळातच आत्ताची युवा पिढी वाचन संस्कृती विसरत चालली आहे शिक्षक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे परंतु शैक्षणिक भांडवल न करता स्वतः सामाजिक प्रबोधन केले पाहिजे प्रत्येक युवा पिढीला आपली संस्कृती आपले आचार विचार आत्मसात केले पाहिजे आपली मायबोली जपली पाहिजे त्यामुळे आपली संस्कृती टिकून राहील असे नवीन लेखकांनी आपले लिखाण केले पाहिजे

     गोव्यात शिक्षिका असून स्वतः प्रबोधन लेख लिहिणारी समीक्षा शेट शिरोडकर ही युवती. हिने सामाजिक आदर्श निर्माण केला आहे आत्तापर्यंत तरुण भारत, गोम्नतक, दैनिक हेराल्ड, गोवन वार्ता, पुढारी, लोकमत, व भांगरभुंय या कोकणी पेपरातून विविध लेख प्रसिद्ध झाले आहेत समीक्षा हिने गोवा विद्यापीठात कोकणी मध्ये पदव्युत्तराचे शिक्षण घेतले आहे व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून मराठीतून पदव्युत्तराचे शिक्षण घेतले आहे. मुंबई विद्यापीठातून बी.एड पूर्ण केले आहे गोव्याच्या विविध चळवळीत सहभाग आहे.

       सम्राट क्लब मये, साहित्य मंथन सत्तरी, कोकणी सेवा केंद्र साखळी, कोंकणी सेवा केंद्र डिचोली, या मधून विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी म्हणून त्या काम करीत आहेत. सद्द्या साहित्य मंथन संस्थेची संयोजक म्हणून ती काम करते. तिच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास प्राचार्य डॉ.भूषण भावे, गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष‌ वसंत भगवंत सावंत, गोवा विद्यापीठाचे प्राध्यापक तसेच लेखक व समिक्षक डॉ. हनुमंत चोपडेकर, शिक्षक श्री. समीर प्रभू उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे कोकणीत पुस्तक लेखन केल्यामुळे गोव्याच्या राज्यभाषेचा गौरव केल्याबद्दल समीक्षाच कौतुक होत आहे

     या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून सुद्धा लेखक उपस्थित राहणार आहे असे संयोजक समितीने सांगितले आहे. समिक्षा ही सामाजिक संस्कृतीक कार्यक्रमामध्ये भाग घेण्यास पुढे असते. तिने विविध स्पर्धाचे परिक्षक म्हणून काम केले आहे. तिला राज्य पातळीवर शिक्षक मर्यादीत निबंध स्पर्धेत दुसरे बक्षिस प्राप्त झाले आहे. तसेच विविध स्पर्धा मध्ये तिने बक्षिसे पटकविले आहेत. विविध कार्यक्रमांचे सुत्रसंचालन केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!