इंटमिजीएट परीक्षेत गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्दचे उज्वल यश

बातमी Share करा:

व्हिजन  २४  तास  न्यूज
म्हसवड  ; प्रतिनिधी
                       रयत शिक्षण संस्थेचे गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द विद्यालयातील  विद्यार्थ्यानी शासकिय चित्रकला इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेत  उज्वल यश मिळवले असून या  विद्यालयाचा शासकिय चित्रकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा  निकाल 100% लागला आहे
          सप्टेंबर महिन्यात शासनाच्या धेय धोरणानुसार विद्यार्थ्यांची शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत रयत शिक्षण संस्थेचे गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द विद्यालयातील आर. एस. पी. च्या बालचित्रकार विद्यार्थिनी कु. दिशा अवघडे A ग्रेड ,कु. गीता गेंड A ग्रेड, कु. मोनिका पवार A ग्रेड,कु. श्रुती फाळके A ग्रेड कु. प्राची अवघडे B ग्रेड, कु. प्रतिभा अवघडे B ग्रेड,कु.अनुजा देवकुळे B ग्रेड,कु. सानिका गाढवे B ग्रेड, कु.श्रावणी कदम B ग्रेड, कु. परवीन मुलाणी B ग्रेड, कु. प्रगती वायदंडे B ग्रेड, विवेक हिरवे B ग्रेड,  श्रीहरी जाधव B ग्रेड मिळऊन उज्वल यश प्राप्त केले. या विद्यार्थी व विद्यार्थिनींना इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेत शासकीय नियमानुसार A ग्रेड प्रमाणे 7 गुण व B ग्रेड प्रमाणे 5 गुण  मिळणार आहेत.*यशस्वी विद्यार्थिनींना विद्यालयातील कला शिक्षक तसेच आर. एस. पी. शिक्षक *श्री. सादिक शेख सर यांचे मार्गदर्शन लाभले*. मार्गदर्शक शिक्षक श्री. सादिक शेख सर व विद्यार्थिनींचे, व पालकांचे माध्यमिक शिक्षण विभाग अधिकारी , रयत शिक्षण संस्था पदाधिकारी , मा .मुख्याध्यापक टकले एम.डी. सर, श्री. उगलमोगले ए. व्ही., श्री. साळुंखे व्ही. बी., श्री. घोडके जी.एन., श्री. माने पी. जे., श्री. जाधव डी. जी., श्री. दयानंद जगदाळे, श्री घाटगे पी. एस., श्रीमती अवघडे के.एस. सर्व शिक्षकवृंद , पालक , शिक्षकेत्तर कर्मचारी , स्कूल कमिटी, मुंबई विकास मंडळ मुंबई,शाळा व्यवस्थापन समिती , शाळा विकास व व्यवस्थापन समिती , सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , माता पालक, आजी व माजी विद्यार्थी,ग्रामस्थांनी हार्दिक! अभिनंदन! करून पुढील वाटचालीस हार्दिक! शुभेच्छा! दिल्या .

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!