अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून पाहणी

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते पाटण( सातारा)

         सडा वाघापूर (ता पाटण )येथे दिनांक 10 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक धरावरील पत्रे उडाले होते .शुक्रवारी दुपारी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालत अनेक घरांचे नुकसान केले आहे अनेकांचे परिवार अक्षरशः उघड्यावर पडले आहेत
          यामध्ये सुमारे 3 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे शुक्रवारी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका सडावाघापूर व आजूबाजूच्या गावांना मोठ्या प्रमाणात बसला आहे . शासनाने त्वरित याची दखल घ्यावी व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तेथील ग्रामस्थ करत होते,

 

           दरम्यान या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराजे देसाई यांनी सडा वाघापूर येथे भेट देऊन वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानीची माहिती घेतली व ग्रामस्थांना दिलासा दिला आणि नुकसान भरपाई बाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, यावेळी ग्रामस्थ व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!