व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड सातारा-पंढरपूर रोडवरील रस्त्याचेअपूर्ण कामांबद्दल ४ तारखेला करण्यात येणारे रास्ता रोको आंदोलन एम एस आर डी सीकडून लेखी आश्वासन मिळाल्यामुळे स्थगित करण्यात आले असल्याचे अकील काझी यांनी सांगितले म्हसवड नगरपरिषद हददीमधील सातारा-पंढरपूर रोडवरील रस्त्याचे अपूर्ण कामाची तात्काळ सुरुवात करावी. अन्यथा ४ तारखेला रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा अकिल मैनुद्दीन काझी अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडी सातारा जिह्वा व विरोधी पक्ष नेता, म्हसवड नगरपरिषद यांनी कार्यकारी अभियंता एम एस आर डी सी बंड गार्डन रोड, पुणे यांना निवेदना द्वारे दिला होता या आंदोलनाची त्वरित दखल घेऊन आज एम एस आर डी सी कडून खालील प्रमाणे लेखी पत्र देऊन रास्ता रोको रद्द करण्याची विनंती करण्यात आली महोदय,
उपरोक्त संदर्भिय पत्रानुसार, आपण सातारा ते म्हसवड राष्ट्रीय महामार्गावरील मौजे म्हसवड, ता. माण येथील अपूर्ण रस्ता बांधकामाच्या संदर्भात ०४/०७/२०२४ रोजी सकाळी ११ वा. रास्ता रोको आंदोलन करत असलेबाबतची माहिती या कार्यालयास सहाय्यक पोलिस निरीक्षक, म्हसवड पोलिस स्टेशन यांनी पत्राद्वारे दिली आहे. तरी सदर बाबत खालील प्रमाणे आपणास कळवणेत येत आहे.
१. पंढरपूर रोड, चांदणी चौक, शिंगणापुर चौक, विश्रामगृह, एस.टी. स्टैंड चौक व संत गाडगेबाबा मंदिर या ठिकाणचे अॅप्रोच रोड चे काम सादर कामाच्या वावामध्ये अंतर्भूत नाही व सदर काम हे निविदेपेक्षा वाढीव काम आहे.
तरी आपले मागणीप्रमाणे सदर वाढीव कामाचे मंजूरीकरीता व निधीचे तरतूदीकरीता मागणी प्रस्ताव रस्ते
वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) कडे करणेत येत आहे. सदर प्रस्ताव मान्य झाल्यास सदर कामे पूर्ण करणेत येतील.
२. सदर लांबीतील रस्ता दुभाजकाचे काम पूर्ण झालेले आहे व रस्ता दुभाजकामध्ये माती टाकणेचे काम प्रगतीत आहे. सदर काम यापुढील १० दिवसात करणेत येईल असे ठेकेदाराने कळवले आहे. ३. सदर लांबीतील हायमास्टचे / पथदिव्याचे काम पूर्ण करणेत आले आहे व त्यानंतर सदर पथदिवे चालू करणेत आले होते. तथापि सदर पथदिवे का बंद आहेत याबाबत नगरपालिका म्हसवड यांचेकडून माहिती प्राप्त करून पथदिवे चालू करणेची कार्यवाही तातडीने करणेत येईल.
आपले तक्रारीनुसार वरीलनुसारची कार्यवाही या कार्यालयामार्फत करणेत आली आहे. तरी आपणास विनंती करणेत येते की आपले दि. ०४/०७/२०२४ रोजीचे प्रस्तावित रास्ता रोको आंदोलन रद्द करावे, ही विनंती.
आश्विनी घोडके (इनामदार) कार्यकारी अभियंता
वरील पत्रानुसार विनंतीला मान देऊन व लेखी आश्वासन मिळाल्यामुळे अकील काझी यांनी आपले आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे