म्हसवड नगरपरिषद हददीमधील सातारा-पंढरपूर रोडवरील रस्त्याचे अपूर्ण कामाची तात्काळ सुरुवात करावी. अन्यथा ४ तारखेला रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा अकिल मैनुद्दीन काझी अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडी सातारा जिह्वा व विरोधी पक्ष नेता, म्हसवड नगरपरिषद यांनी कार्यकारी अभियंता एम एस आर डी सी बंड गार्डन रोड, पुणे यांना निवेदना द्वारे दिला आहे या निवेदनात अकील काझी यांनी म्हटले आहे की म्हसवड नगरपरिषद हददीमधील सातारा-पंढरपूर रोडवरील चांदणी चौक, शिंगणापूर चौक, विश्रामगृह, एस.टी स्टँड चौक व संत गाडगेबाबा मंदिर येथे अॅप्रोच रस्त्याचे काम अपूर्ण आहे. या अपूर्ण कामांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे सामान्य जनतेला जीवित व मालमत्तेचे नुकसान सहन करावे लागत आहे.
डिवायडरचे काम आणि माणगंगा नदीवरील पुलाचे काम देखील अपूर्ण आहे. यासोबतच डिवायडर मधील पथदिवे व हायमास्ट बंद अवस्थेत आहेत. या अपूर्ण कामांमुळे नागरिकांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होत असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे
त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की, या सर्व कामांची तात्काळ सुरुवात करावी. अन्यथा, दिनांक ०४/०७/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता एस.टी. स्टँड येथे रस्ता रोको करण्यात येईल. या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील, याची कृपया नोंद घ्यावी.असेही शेवटी नमूद केले आहे या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी सो, सातारा, उपविभागीय अधिकारी सो, माण खटाव, उपविभाग दहिवडी , तहसीलदार सो, माण (दहिवडी) , मुख्याधिकारी सो, म्हसवड, सहायक पोलीस निरीक्षक, म्हसवड पोलीस ठाणेयांना देण्यात आल्या आहेत