म्हसवड येथे अप्पर तहसील कार्यालयाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड, ता. माण:
माण तालुक्यातील म्हसवड परिसरातील 47 गावातील नागरिकांच्या सोयीसाठी मंजूर करण्यात आलेल्या अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यालयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दहिवडीला जाण्याची आवश्यकता कमी होणार असून शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांनी यावेळी केले.


