म्हसवड मध्ये “फुड फेस्टिव्हलचे” शानदार उदघाटन.
म्हसवड – श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालय’ तर्फे विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने भितिपत्रक व फुड फेस्टिव्हलचे शानदार आयोजन करण्यात आले होते.
उद्योजकता विकास कार्यक्रम अंतर्गत भितिपत्रक व फुड फेस्टिव्हलचे उदघाट्न शिवकृपा सहकारी बँकेचे शाखाधिकारी दिगांबर गायकवाड व माणदेशी महिला बँकेच्या शाखाधिकारी मनीषा फडतरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कदम होते. यावेळी एम. लॉ चे प्रा. अॅड. राजू भोसले, प्रा. मनीषा सावंत मॅडम , प्रा. कु. एन .बी. तांबोळी मॅडम , प्रा. डॉ. एस. ए. मुल्ला मॅडम, प्रा. डॉ. महेश सोनावणे, प्रा. डॉ. रमेश बोबडे, प्रा. डॉ. जितेंद्र बनसोडे, प्रा. डॉ. कुळाल टी. एस., प्रा.क्षीरसागर व्हीं. डी., IQAC चे प्रा. रणवरे डी. जे. व प्रा. डॉ. जाधव एस. एस.,स्किल इंडिया लिमिटेड चे संचालक प्रा. रोहित कोळी आदी मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामीण व शहरी पद्धतीचे विविध खाद्य पदार्थ चविष्ट पणे बनविलेले होते. व खाद्य पदार्थ स्टॉल लावले होते. यामध्ये गावरान मिसळ, वडापाव, भजी, ढोकळा, गुलाब जामून, पाणीपुरी, कचोरी व विविध स्नॅक्स हे पदार्थ विशिष्ट चविष्ट बनविलेले होते. याच वेळी कॉमर्स विभागातील विदयार्थ्यांनी भारतातील यशस्वी उद्योजक आणी त्यांचा इतिहास तसेच व्यवस्थापनातील विचारवंत यांची भितिपत्रक तयार करून प्रदर्शना मध्ये प्रदर्शित केली होती.
याप्रसंगी खाद्य पदार्थ आस्वाद सर्व पाहुण्यांनी घेतला. भितीपत्रकाचे विशेष कौतुक केले. यामध्ये माणदेशी उद्योजिका चेतना सिन्हा यांच्या वर आधारीत भितीपत्रक विशेष लक्षवेधी होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कदम, शिवकृपा सहकारी बँकेचे शाखाधिकारी दिगांबर गायकवाड, महिला बँकेच्या शाखाधिकारी मनीषा फडतरे, एम. लॉ चे प्रा. अॅड. राजू भोसले, प्रा. मनीषा सावंत मॅडम यांनी मनोगते व्यक्त करून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विध्यार्थ्यानी पदार्थ विक्री करून एक यशस्वी उद्योजक कसे बनता येइल याचा अनुभव घेतला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एम. लॉ चे प्रा. अॅड. राजू भोसले यांनी केले. स्वागत प्रा. कु. मनीषा सावंत मॅडम यांनी केले. व आभार प्रा. कु. एन .बी. तांबोळी मॅडम यांनी मानले.