सातारा येथे ऑफ रोडिंग स्पर्धांमध्ये भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष करणभैय्या सुनील पोरे यांच्या थार गाडीने प्रथम क्रमांक पटकावला
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
सातारा येथे नुकत्याच झालेल्याज्ञऑफ रोडिंग स्पर्धेमध्ये म्हसवडचे सुपुत्र व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष करणभैया पोरे यांनी या चित्त थरारक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली.
3 व 4 ऑगस्ट 2024 रोजी द फॉरेस्ट लिफ नेचर रिसॉर्ट केळवली ,सातारा येथे Club WOW SATARA ( Wander on wheels ) यांच्या मार्फत ऑफ रोडिंग इंटू द जंगल ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये एकूण 34 गाड्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणा वरून सहभाग नोंदवला होता .
या स्पर्धा तीन प्रकारच्या कॅटेगरीज मध्ये भरवण्यात आल्या होत्या त्यामध्ये एसयूव्ही ( SUV ) वाहन कॅटेगरी डिझेल ( Diesel) वाहन व पेट्रोल (petrol) वाहन कॅटेगरी होते . या स्पर्धा एकूण दोन दिवस घेण्यात आल्या