म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात, भाविकांच्या सोयीसाठी आता सर्क्युलर डस्ट इंपोर्टेड फॅन..
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
दिलीपराज किर्तने.
म्हसवड ( प्रतिनिधी )
येथील श्री सिद्धनाथ मंदिरातील गाभाऱ्यांमधील गरम, प्रदूषित हवा बाहेर जाऊन गाभारा थंड राहण्यासाठी व शुद्ध हवा गाभार्यात येण्यासाठी आता सर्क्युलर डस्ट इम्पोर्टेड फॅन बसवण्यात आला आहे
कै. सौ. सीमा शांताराम जाधव चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, राजाराम रामचंद्र जाधव यांचे चिरंजीव निलेश यांच्यातर्फे बसव ण्यात आला आहे सदर यंत्रणेमुळे भाविकांना गाभाऱ्यामध्ये होणारा उकाड्याचा व घामाचा त्रास आता होणार नाही व भाविकांना गाभाऱ्यामध्ये वातावरण थंड राहील.
श्री शांताराम जाधव यांनी पुण्यातील रियल लाईफ रियल पीपल सामाजिक काम करणाऱ्या संस्थेस रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर व कै स्मिता शांताराम जाधव चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत गोरगरिबांच्या मोफत सेवेसाठी, अत्याधुनिक साधारणपणे दहा लाख रुपयांची ॲम्बुलन्स भेट दिली आहे. तसेच पुणे व रायगड जिल्ह्यातील 70 ते 80 कॉटेज मध्ये सॅनिटरी नॅपकिन व डिस्पोजल मशीन साधारणपणे दोन्ही मशीनची किंमत 40 ते 50 हजार आहे असा 70 ते 80 कॉटेजमध्ये बसवल्या आहेत.
तसेच ज्ञानगंगा वाचनालय या नावाखाली साधारणपणे शंभर ग्रामीण भागातील शाळेमध्ये तीनशे पुस्तके व एक कपाट, सौ स्मिता शांताराम जाधव चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या माध्यमातून दिले आहे तसेच पुणे जिल्हा व रायगड जिल्ह्यामध्ये अफ्लोरटेबल केमोथेरपी या उपक्रमाद्वारे सौ.सिमा शांताराम जाधव चॅरिटेबल ट्रस्ट,रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगर आणि मार्केट रोटरी क्लब ऑफ यू एस ए यांच्या सहकार्याने 10 हॉस्पिटल मध्ये मशिनरी बसवण्यात आली.प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 10 बेडची सोय करण्यात आली असून हॉस्पिटलला देण्यात आलेली आर्थिक मदत ही प्रत्येकी सुमारे दहा लाख रुपयांची आहे.
अशी असंख्य कामे, कै.सिमा शांताराम जाधव चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत गोरगरिबांच्या कल्याणासाठी करण्यात आली असल्याचे शांताराम जाधव यांनी सांगितले.
भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या गाभाऱ्यात कुलिंग यंत्रणा बसविणाऱ्या ट्रस्ट व कुटुंबाचा सत्कार सालकऱ्यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पहार प्रसाद देवून करण्यात आला.
यावेळी शांताराम जाधव,प्रकाश कोकरे,निलेश जाधव,यश किशोर जाधव ,मंदिराचे सालकारी,देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, विश्वस्त,सचिव उपस्थित होते.