पानमळा म्हसवड तालुका माण येथे एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार व विनयभंग केल्याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली या बाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी दिनांक-20/05/2024 रोजीचे रात्रौ 11.00 वा.चे सुमारास मौजे पाणमळा म्हसवड ता.माण जि.सातारा गावचे हद्दीत आरोपीचे राहते घरी घडलेला असुन फिर्यादी यांची पीडित मुलगी वय 15 वर्षे 2 महिने हि अल्पवयीन असल्याचे माहीत असुनसुद्धा शरद रामदास नामदे (वय २४ वर्षे )रा.पाणमळा म्हसवड ता.माण जि.सातारा याने घरी येऊन तिला घाबरवुन जिव देण्याची धमकी देऊन आपण तुझ्यावर प्रेम करतो असे सांगुन तुझ्यासोबत महत्वाचे बोलायचे आहे. असे सांगुन त्याचे घरी नेवुन तिचे इच्छेविरुद्ध तिचेसोबत जबरदस्तीने दोन वेळा शारिरीक संभोग केला. म्हणुन संबधित मुलीच्या आईने शरद रामदास नामदे रा.पाणमळा म्हसवड ता.माण जि.सातारा याचेविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली
म्हसवड पोलिसांनी घटनेची तातडीने दखल घेऊन आरोपी शरद नामदे याचे विरुद्ध गुरनं व कलम 167/2024 IPC 376,376(2)(N)(I),354,506,पोक्सो 4,6,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करून तातडीने अटक केली सदर गुन्ह्याचा तपास सपोनि सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनि अनिल वाघमोडे करत आहेत