बेकायदेशीर दारू विक्री व उत्पादन प्रकरणी दहिवडी पोलिसांची कारवाई; सहा आरोपींना नोटीस
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड प्रतिनिधी
दहिवडी पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत वावरहिरे व नवलेवाडी परिसरात केलेल्या विशेष कारवाईत बेकायदा देशी दारू विक्री व गावठी हातभट्टी दारू उत्पादन प्रकरणी एकूण सहा गुन्हे दाखल केले असून सहा आरोपींना BNSS कलम 35(3) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दि. 24 जुलै रोजी वावरहिरे (ता. माण) गावाच्या हद्दीत झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दहिवडी पोलिसांनी खालीलप्रमाणे कारवाई केली :
🔹 गुन्हा क्र. 242/2025 – आरोपी बाळु श्रीपती जाधव याच्याकडून 21 देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹735/-) जप्त.
🔹 गुन्हा क्र. 243/2025 – आरोपी सौरभ रमेश भोसले याच्याकडून 19 बाटल्या (₹665/-) जप्त.
🔹 गुन्हा क्र. 244/2025 – आरोपी रामचंद्र साहेबराव गलंडे याच्याकडून 13 बाटल्या (₹910/-) जप्त.
🔹 गुन्हा क्र. 245/2025 – आरोपी शरद नारायण पांढरे याच्याकडून 11 बाटल्या (₹770/-) जप्त.
याशिवाय, दि. 23 जुलै रोजी नवलेवाडी येथे मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू तयार करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले.
🔹 गुन्हा क्र. 233/2025 – आरोपी संपत गणपत मदने याच्याविरुद्ध कारवाई करत 19980/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 35 लिटर हातभट्टी दारू, 470 लिटर रसायन व उत्पादनासाठी लागणारे साहित्य होते.
या सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपींना BNSS कलम 35(3) अंतर्गत नोटीस देण्यात आली असून, अधिक तपास सपोनी दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली स.पो.फौ. हांगे, एन. खाडे आणि इतर अधिकारी करत आहेत.
दहिवडी पोलिसांनी स्थानिक जनतेस आवाहन केले आहे की, बेकायदेशीर दारू उत्पादन व विक्री करणाऱ्यांविषयी माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.