व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) सादिक शेख नाशिक पोलीस टाइम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी लोकसेविका श्रीमती सपना सुखदेव घोळवे वय- 40 वर्ष, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सातारा, वर्ग-1 यांचेकडे अतिरिक्त कार्यभार सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग जिल्हा सांगली येथील असल्याने त्यांनी जिल्हा सांगली येथे वर नमूद कार्यालयात त्यांचे सहकारी लोकसेवक श्री. दीपक भगवान पाटील वय 36 वर्ष समाज कल्याण निरीक्षक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग जिल्हा-सांगली वर्ग-3 यांनी तक्रारदार यांचेकडे पाच लाख रुपये व त्यानंतर अडीच लाख रुपये लाचेची मागणी करून एक लाख रुपये स्वीकारलेने त्यांचे विरुद्ध सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे.लोकसेविका श्रीमती सपना सुखदेव घोळवे यांचे सातारा येथील पत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा कार्यालयाकडून श्री.राजेश वाघमारे व त्यांची टीम झडती घेत असून पुढील कार्यवाही करीत आहे.