विधानसभा निवडणूक 2024 साठी पाटण तालुक्यातील तिन्ही उमेदवारांनी एकाच दिवशी अर्ज दाखल केला.महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद कदम तर महायुतीचे उमेदवार आमदार शंभूराज देसाई तसेच अपक्ष निवडणूक लढविणारे सत्यजित पाटणकर यांनी आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान,अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांनी आपल्या पाटणकर समर्थकांसह बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला तर महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांनी केवळ मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीचा धुळा खऱ्या अर्थाने उडायला सुरुवात झाली आहे.पाटण तालुक्यातील तिन्ही उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीचा एक टप्पा पार केला आहे. आता प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात होणार आहे. महाविकास आघाडीने तिकीट डावल्याने अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या सत्यजित पाटणकर यांनी भव्यशक्ती प्रदर्शन करून झलक दाखवली आहे.अर्ज भरल्यानंतर त्यांनी बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या ठिकाणी भव्य सभा आयोजित केली होती. निष्ठेचा प्रतीक म्हणून विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडे पाहिले जाते परंतु,आपल्या कार्यकर्त्यांना निष्ठेची ठेच लागली असून तालुक्यात एकीकडे सत्ता पैसा याला भीक न घालता स्वाभिमानी जनता आज या ठिकाणी उपस्थित आहे.येणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करून जोरदार रॅली काढली झेंडा चौक पाटण येथून रॅलीला सुरुवात झाली व लोकनेते बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या पटांगणात सभा घेण्यात आली. कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले होते प्रचंड घोषणाबाजी देत कार्यकर्त्यांनी पाटणकरांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिले. तर शंभूराज देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येराड प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपाचे भरत पाटील, शरद पवार गटाचे संजय देसाई, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आरपीआयचे रवींद्र सोनवले यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्या बरोबर हजेरी लावली तर अपक्ष उमेदवार असलेले सत्यजित पाटणकर यांच्या व्यासपीठावर काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव बापू पाटील यांनी हजेरी लावली. त्यामुळे काँग्रेस अपक्ष उमेदवार सत्यजीत पाटणकर यांच्या सोबत असल्याचे दिसून आले.