म्हसवडमध्ये इंजि. सुनील पोरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा; रक्तदान शिबिराने ठरला आदर्श प्रेरणादायी
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
सामाजिक, शैक्षणिक, आणि धार्मिक क्षेत्रात आपल्या निःस्वार्थ सेवाकार्याने विशेष स्थान निर्माण करणारे इंजि. सुनील पोरे यांनी आपला 63 वा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.या निमित्ताने म्हसवड येथे भव्य रक्तदान व अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते,या वेळी 121 रक्तदात्यांनी रक्तदान करून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या
या वाढदिवसाच्या निमित्ताने माण विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आ. जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी इंजि. सुनील पोरे यांना केक कापून शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.
रक्तदान शिबीर
जनश्री फाउंडेशनचे संस्थापक असलेल्या इंजि.सुनील पोरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक सेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. रक्तदान शिबिरे, गोरगरीबांना आर्थिक सहकार्य, कोरोनाकाळात पीडितांना मदत, ना नफा ना तोटा तत्त्वावर अँब्युलन्स सेवा, वारकरी संत मंडळींचा सन्मान, आणि स्वच्छ पाण्याच्या मागणीसाठी संघर्ष तर रखडलेल्या रस्त्यासाठी उपोषण अशा विविध उपक्रमांमुळे ते जनतेच्या हृदयात विशेष स्थान मिळवून आहेत.