म्हसवडमध्ये स्मार्ट मीटरच्या जादा बिलावरून ग्राहकांमध्ये संताप; राजकुमार डोंबे यांनी दिले महावितरणला निवेदन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (ता. माण) –
महावितरणने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे ज्या ग्राहकांना चार-पाचपट जास्त वीज बिल आले आहे, अशा ग्राहकांची समस्या ऐकण्यासाठी महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री. माळवदे व ग्रामीण विभागाचे सहाय्यक अभियंता श्री. थोरात यांच्याशी सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे यांनी समक्ष चर्चा केली.

या बैठकीसाठी राजकुमार डोंबे यांनी स्मार्ट मीटरग्रस्त ग्राहकांना महावितरण कार्यालयात बोलावले होते. यावेळी अनेक नागरिक आपल्या वाढलेल्या वीज बिलाच्या पावत्या घेऊन उपस्थित होते. त्यांच्या तक्रारींचे निराकरण माळवदे साहेबांनी केले.

स्मार्ट मीटर बसवू नयेत, यासंदर्भातील निवेदन याआधीच महावितरण कार्यालयाला देण्यात आले होते. यावेळी देखील श्री. डोंबे यांनी ही मागणी पुन्हा उपस्थित अधिकाऱ्यांसमोर मांडली. स्मार्ट मीटर बसवणाऱ्या कंत्राटदारांना फोनवर विचारणा केली असता, “वरून ऑर्डर आहे,” असे उत्तर देण्यात आले, असे डोंबे यांनी सांगितले.

“स्मार्ट मीटर बसवल्यामुळे ग्राहकांना अनियंत्रित व भरमसाठ बिले येत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. हे रोखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत त्वरीत सूचना पोहोचवाव्यात आणि निर्णय होईपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याचे काम थांबवावे,” अशी मागणी श्री. डोंबे यांनी केली. या मागणीची दखल घेत सहाय्यक अभियंता माळवदे यांनी उपविभागीय कार्यालय, दहिवडी यांना पत्र पाठवले असून त्याची प्रत डोंबे यांना देण्यात आली.

यावेळी राजकुमार डोंबे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “स्मार्ट मीटरच्या विरोधात चाललेल्या लढ्यात सर्वांनी एकत्र यावे. प्रत्येक घरात वीजेचा प्रश्न आहे. ज्या नागरिकांना जास्त बिल आले आहे, त्यांनी स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीचे व नंतरचे बिल यांची झेरॉक्स आमच्याकडे जमा करावी.”

यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!