व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला ऍड. गौरव सरोदे अर्धापूर : प्रतिनिधी – मागील काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे अर्धापूर तालुका व शहरातील शेतकरी व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिके करपून गेली, घरात पाणी शिरल्याने घरातील गादी, पलंग, धान्यसाठा, गॅसची टाकी यांसह इतर सर्व वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
अशा गंभीर परिस्थितीतही शासन व प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळालेली नाही, उलट आपत्ती व्यवस्थापनाचा निधी असूनही निष्काळजीपणा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे दि. २९ ऑगस्ट २०१९ रोजी कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी झालेल्या शासन निर्णयाच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना देखील सरसकट व शंभर टक्के मदत देण्यात यावी, अशी मागणी अर्धापूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीने केली आहे.
काँग्रेसतर्फे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी, पालकमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे –
पंचनाम्यांची वाट न पाहता सर्वांना सरसकट मदत द्यावी
पूरग्रस्तांची कर्जमाफी करावी
प्रचलित अनुदानाच्या तिपटीने अनुदान द्यावे
पुरपीडितांना ३० ते ४५ हजार रुपये घरकुल अनुदान तातडीने द्यावे
काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, “जनता पावसाने हैराण आहे आणि आमदार-खासदार विदेश दौऱ्यावर! जिल्ह्याचे पालकमंत्री केवळ कागदोपत्री असून अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही.”
या निवेदनावर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब देशमुख आंबेगावकर, ज्येष्ठ नेते मिर्झा अख्तरउल्ला (पप्पू) बेग, सचिव शेख मकसूद, भागवत कदम, शहर कार्याध्यक्ष भीमराव सरोदे पेंटर, शहर उपाध्यक्ष फेरोज पठाण, अॅड. नितेश लोणे, अॅड. गौरव सरोदे, महेंद्र सरोदे, मिर्झा अबुझरउल्ला बेग आदींच्या सह्या आहेत.