व्हिजन २४तास न्यूजच्या बातमीचा तात्काळ इफेक्ट — शिवडे फाटा हायवेवरील लाईट अखेर सुरु!

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड प्रतिनिधी :
दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी व्हिजन २४तास न्यूजने दिलेल्या विशेष बातमीचा तात्काळ परिणाम दिसून आला असून, शिवडे फाटा येथील हायवेवरील गेले अडीच महिने बंद असलेली लाईट अखेर ११ एप्रिल रोजी सुरु करण्यात आली आहे.

या लाईट बंदीमुळे परिसरात नागरिकांना रात्रीच्या वेळेस प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. शॉर्टसर्किटमुळे लाईट बंद होती, परंतु राजन प्रा. कन्स्ट्रक्शनचे श्री. धनराज चव्हाण यांनी देखभाल दुरुस्ती करूनही लाईट सुरु होत नव्हती. कारण, लाईटचे थकीत बिल न भरल्यामुळे ती महावितरणकडून बंद ठेवण्यात आली होती.

व्हिजन २४तास न्यूजने या विषयावर आवाज उठवत ४ एप्रिल रोजी सविस्तर बातमी दाखवली होती. त्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कराड उत्तरचे तालुकाप्रमुख मा. संजय भोसले यांनी दिलेला इशारा, महावितरणच्या सौ. जाधव मॅडम यांच्याशी चर्चा, आणि नॅशनल हायवेचे श्री. पाटोळे, अदानी कंपनीचे श्री. सचिन देवकर यांच्याशी झालेला संवाद याचे सविस्तर विवेचन करण्यात आले होते.

या बातमीनंतर संबंधित विभाग खडबडून जागे झाले आणि शिवसेना व ग्रामस्थांच्या पाठपुराव्याच्या बळावर आज लाईट अखेर सुरु करण्यात आली. यात उंब्रज पोलीस निरीक्षक रवींद्र बोरे, महावितरण अधिकारी वैशाली जाधव, राज इन्फ्राचे श्री. चव्हाण, आणि पत्रकार बंधूंचे सहकार्य महत्त्वाचे ठरले.

व्हिजन २४तास न्यूजने दाखवलेल्या बातमीमुळे प्रशासन जागे झाले आणि शिवडे फाटा परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला. ही बातमी केवळ प्रकाश टाकणारी नव्हती, तर प्रत्यक्षात परिणाम साधणारी ठरली.

शिवसेनेने यापुढे असा इशारा दिला आहे की, “पुन्हा एकदा लाईट बंद झाल्यास किंवा कोणतीही विपरीत घटना घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील. त्यावेळी शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

या आंदोलनाच्या व पाठपुराव्याच्या वेळी श्री संभाजी घाडगे, सागर कुलकर्णी, शंकरराव घार्गे, कोंडीबा गुजले, सोन्या जांभळे, विलास कारंडे, श्री कमाणे, साहिल मुल्ला, पालसांडे येथील शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!