सैनिकांच्या प्रलंबित तक्रारीवर तात्काळ कारवाई करा तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड:प्रतिनिधी
बुधवार दी. २३/0७/२०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथे सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा पोलीस प्रमुख . तुषार दोषी यांच्या अध्यक्षतेखाली व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडुकर व महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग उप संचालक व सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे(नि .) याच्या उपस्थितीत आजी/ माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय शहीद जवान कुटुंबिय यांना संरक्षण देण्या बाबत “सैनिक संरक्षण समिती” आढावा बैठक संपन्न झाली आहे
या बैठकी दरम्यान मागील बैठकीचे इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले व नवीन असणाऱ्या सैनिकांच्या समस्या अडचणी विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली व संरक्षण समिती सदस्याकडून सैनिकांच्या समस्या मांडण्यात आल्या.
१)आजी-माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय शहीद जवान कुटुंबीय यांच्या समस्या,अडचणी विषयी 24 तासाच्या आत त्यांना निर्णय मिळावा व त्या तक्रारीवर कार्यवाही व्हावी या साठी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी “सातारा दक्ष ॲप” कार्यान्वित केले आहे त्याची अंमलबजावणी व्हावी या साठी सूचना करण्यात आली.
२) सेवारत सैनिक व माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय यांच्या पोलिस स्टेशनला असणाऱ्या प्रलंबित तक्रारी संरक्षण समिती च्या बैठकीत मांडण्यात आल्या व तक्रारदार यांचे म्हणणे पोलिस अधीक्षक यांनी समजून घेऊन ज्या तालुक्यातील पोलिस स्टेशनला तक्रारी प्रलंबित आहेत त्यांना तत्काळ कारवाई करणे बाबत सूचना देण्यात आली. या बैठकी दरम्यान अनेक सैनिकांच्या समस्या विषयी चर्चा करण्यात आली.
३) आजी/माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय यांच्या तक्रारी निवारण करणे बाबत वेगळे रजिस्टर मध्ये तक्रारी सर्व पोलिस स्टेशन ला नोंदवण्यात येतील अशी सूचना केली.
पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांचा सैनिक कल्याण अधिकारी सातारा व माजी सैनिक संरक्षण समिती सदस्य यांनी पुष्प गुच्छ देऊन याप्रसंगी सन्मान करण्यात आला
या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय सहायक सैनिक कल्याण अधिकारी .रवींद्र इतापे, व जिल्हा सैनिक कल्याण संघटक अंकुश पवार व प्रदीप निकम , प्रशांत कदम सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व संरक्षण समिती सदस्य,कॅप्टन अशोक नलवडे संरक्षण समिती सदस्य, सातारा तालुका अध्यक्ष व सदस्य संजय निंबाळकर , उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, सदाशिव नागणे अध्यक्ष कराड तालुका , .संतोष यादव उपाध्यक्ष पाटण तालुका, सुभेदार मेजर नि.श्री.राजाराम माळी, . मस्कु अण्णा शेळके सदस्य संरक्षण समिती,.दीपक काकडे कार्याध्यक्ष खंडाळा तालुका, . अनिल शिंदे माजी सैनिक,. राजेंद्र शेवाळे माजी सैनिक, .आनंदा सोनवणे माजी सैनिक, सर्व तालुक्यातील माजी सैनिक उपस्थित होते.