राष्ट्रीय काँग्रेस तर्फे म्हसवड मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन
व्हिजन २४ तास न्युज (संपादक अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड येथे मदिना मस्जिद व जामा मस्जिद येथे पवित्र रमजान महिन्याच्या इफ्तारीच्या निमित्ताने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रणजीत भैय्या देशमुख, मा. नगराध्यक्ष महेश गुरव , माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, युवा नेते सचिन शांताराम माने, मार्गदर्शक राजेंद्र माने सर, विजय माने, नानासाहेब राजमाने यांनी मुस्लिम बांधवांना इफ्तारी निमित्ताने खजूर व फळांचे वाटप केले.
रणजीत भैय्या यांनी सर्व मुस्लिम बांधवांना शब ए कदर व रमजान ईद च्या मशिदीत जाऊन शुभेच्छा दिल्या व हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले, त्या वेळी मुस्लिम बांधवांन तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला त्या वेळी दाऊद मुल्ला, फारुक शिजाउद्दिन काझी, शब्बीर नदाफ, यासीन तांबोळी, शौकत भाई मुल्ला, गब्बार काझी ,आमिर तांबोळी , शब्बीर तांबोळी, मोतीलाल तांबोळी ,रेहान काझी , साकिब काझी, रियाझ मनेर, आरिफ भाई तांबोळी, रियाझ काझी, कदिर मिस्त्री, जाफर तांबोळी , रहीम काझी, मोहसीन तांबोळी, पिंटू मुल्ला, इर्शाद अतार, निसार आतार, बाबलाल आतार, ताजुद्दिन तांबोळी, अहमद काझी, असे सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.