इफ्तार पार्टीमुळे सामाजिक सलोखा राखण्यात मोठी मदत – आमदार जयकुमार गोरे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )

                   

म्हसवड
         मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, उपवास सोडण्यासाठी नुकतेच म्हसवड येथील भगवान गल्ली येथे रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पाडली. सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असल्याचे मत  आमदार जयकुमार गोरे  यांनी व्यक्त केले.सदर प्रसंगी मुस्लिम समाजातील नागरिकांची अत्यंत मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. जयकुमार गोरे   यांनी रोजे ठेवणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र रमजान महिन्याच्या  शुभेच्छा दिल्या.
                     या कार्यक्रमाचे आयोजन आमदार गोरे यांच्या वतीने नगरसेवक आकिल काझी यांनी केले होते  भगवान गल्ली  येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता इफ्तार पार्टी झाली. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे  नगरसेवक अकिल काझी  माजी नगराध्यक्ष नितीन दोशी ,विजय धट इंजि.सुनील पोरे नगरसेवक संजय  सोनवणे   ईरशाद काझी ,निहाल काझी ,  नसरुद्दीन काझी  आदी मान्यवर उपस्थित होते .      या कार्यक्रमास शुभेच्छा देताना आमदार गोरे म्हणाले की,आज या ठिकाणी मुस्लिम बांधवा सोबत हिंदु बांधव देखिल मोठ्या संखेने उपस्थित आहेत   सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणेसुद्धा महत्त्वाचे आहे.
           दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधु भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. अशा सणांमुळे हिंदू-मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात. सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असून त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची आहे.
             या पवित्र महिन्यामध्ये सर्वांनाच सुख-समृद्धी प्राप्त व्हावी. तसेच समाजात शांतता प्रस्थापित करण्याकरिता तसेच देशातील सर्व धर्मीयांमध्ये सौदाह्य प्राप्त होण्याकरता आपण सर्वांनीच एकत्र येऊन या पुढील काळात निश्चित प्रयत्न करायला हवेत. रोजा ठेवणाऱ्या सर्व बांधवांना आत्मिक बळ प्राप्त व्हावे हीच आपण प्रार्थना करूया असे म्हणून आमदार गोरे यांनी प्रत्येकाला स्वत: खजूर चारली व शुभेच्छा दिल्या यावेळी इर्शाद काझी यांनी २७ व्या रोजाचे महत्व सांगीतले अमीर तांबोळी यांनी  पवित्र रमजान महिण्याचे महत्व सांगीतले 
           सदर प्रसंगी   आशपाक मुल्ला ,दाऊद मुल्ला, जाकीर सय्यद (अल्पसंख्याक अध्यक्ष भाजपा) ,मुसाशेख ,सरफराज काझी, असिफ मुजावर ,  समिर शेख,  अरिफ तांबोळी, फैय्याज तांबोळी, मंहमद तांबोळी,   मोहसिन मुजावर, मंहमद मुजावर, शौकत मुल्ला ,इम्रान मुल्ला ,अमिर तांबोळी यांचेसह मोठ्या संखेने मुस्लिम बांधव उपस्थित  होते .

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!