शरीर निरोगी ठेवायचे आसेल तर सायकलींग व्यायाम गरजेचा – इंजि. सुनील पोरे.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
विजयकुमार  ढालपे
गोंदवले -प्रतिनिधी
म्हसवड येथील शुभम गॅसचे प्रोप्रायटर व निवृत्त अभियंता समाजसेवक सुनील  पोरे हे नुकतेच सालाबादप्रमाणे श्रीक्षेत्र गोंदवले येथील ब्रम्हचैतन्य समाधी मंदीराचे दर्शन घेण्यासाठी म्हसवड ते गोंदवले बुद्रुक व परत म्हसवड  असा सायकल ने प्रवास करत आले होते यावेळी त्यांच्याशी चर्चा करताना निरोगी जिवन व्यतीत करायचे आसेल तर सायकलींग व्यायाम प्रभावी आहे असे ते म्हणाले ते म्हणाले दर श्रावणात मी म्हसवड ते पंढरपूर असा प्रवास करतो तसेच शिखरशिंगणापूर व श्रीक्षेत्र गोंदवले बुद्रुक असा सायकलींग प्रवास देखील वेळोवेळी होतो तसेच मी दररोज किमान दहा किलोमीटर सायकलींग करतो त्याचबरोबर स्विमींग देखील करतो.
       सद्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीने किमान एक तास तरी आपल्या शरीराचे समतोल राखण्यासाठी व निरोगी जीवन ठेवण्यासाठी व्यायाम करने नित्याचे व गरजेचे आहे असे प्रकट विचार सुनील  पोरे साहेब यांनी व्यक्त केले त्यांच्या समवेत म्हसवड येथील पत्रकार अहमद मुल्ला (सेवानिवृत्त शिक्षक ) हे  देखील म्हसवड पासून सायकलींग करत श्रीक्षेत्र गोंदवले येथे आले होते.यावेळी गोंदवले येथे पत्रकार फिरोज तांबोळी,विजय ढालपे, डी आर.कट्टे सर.यांनी त्यांचे चहा पान देऊन स्वागत केले यावेळी  देवदर्शनासाठी आलेले पनवेलचे सायकलीस्ट वैभव आग्रे  यांनी देखील भेट घेऊन शुभेच्छा दिल्या व इतरांनी देखील यांचे अनुकरण करावे अशी इच्छा व्यक्त केली.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!