उरमोडीचे पाणी म्हसवड राऊत वाडी बंधारा भरण्यासाठी   सोमवार पर्यंत न सोडल्यास उपोषण करणार :विजयभाऊ सिन्हा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड –
              उरमोडीचे पाणी म्हसवड राऊत वाडी बंधारा भरण्यासाठी   सोमवार पर्यंत नसोडल्यास उरमोडीच्या पाण्यासाठी उपोषण करणार असल्याचे निवेदन सातारा जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले आहे.
       माण तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत येथील नागरिकांना व पशुधनाला दिलासा देण्यासाठी गत आठवड्यात उरमोडीचे पाणी काही भागात सोडण्यात आले. त्यामध्ये म्हसवड परिसरात माण नदीत काही प्रमाणात आले त्या पाण्याने रिंगावन पेठ यात्रा पटांगण मैदानालगतचा माण नदीवरील माणदेशी फौडशनने बांधलेला बंधारा भरला आणि उरमोडीचे पाणी बंद झाले. तेथून पुढे दोन किमी अंतरावरील राऊत वाडी बंधारा मात्र कोरडा ठणठणीत राहिला तिथे काही दिवसांपासून पाण्यावाचून जनावरांचे व माणसांचे गत काही महिन्यांपासून प्रचंड हाल सुरु आहेत उरमोडीच्या पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी पैसेही भरले आहेत तरी राऊत वाडी बंधाऱ्यात पाणी आलेले नसल्याने अनेक दिवस पाणी येईल या आशेवर असणाऱ्या   येथील नागरिकांच्या आशेवर उरमोडीच्या अधिकाऱ्यांनी सोडलेले पाणी बंद करुन जखमेवर मिठ चोळल्याची भावना निर्माण झाली आहे.
      उरमोडीचे पाणी राऊत वाडी बंधाऱ्यात  येत्या सोमवारपर्यंत न सोडल्यास येथील नदीपात्रातील स्मशानभूमीजवळ उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन माजी नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ सिन्हा यांनी प्रशासनाला दिले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!