देवेंद्र फडणवीस जर जलसंपदा मंत्री नसते तर माण – खटावला कधीही पाणी मिळालं नसतं : जयकुमार गोरे
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
कृष्णा खोरे लवादाचा निर्णय बदलण्याचा आणि पाण्याचे फेरवाटप करण्याचा अभूतपूर्व निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन दाखवला. त्यांच्यामुळेच माण, खटावच्या वंचित भागाला पाणी उपलब्ध झाले आहे. देवेंद्र फडणवीस जर जलसंपदा मंत्री नसते तर या भागाला कधीही पाणी मिळालं नसतंटेंभूच्या आरक्षित झालेल्या अडिच टीएमसी पाण्यामुळे ३७ हजार हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रात येणार आहे. फडणवीअ सोडून आजपर्यंत आपल्या मातीविषयी प्रेम असणारा दुसरा कुणी नेताच आपल्या पाठिशी ठामपणे उभा राहिला नसल्याची खंत आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली. मतदारसंघात माझ्याशी विकासकामांची स्पर्धा करा मात्र वैयक्तिक पातळीवर लायकी नसताना विनाकारण टीका कराल तर कंबरेलापण काही रहाणार नाही असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
टेभूच्या तिसऱ्या सुधारीत प्रकल्प लाभक्षेत्रात नव्याने समावष्ट केलेल्या कुकुडवाड गटातील ११ गावे व त्याअंतर्गत येणाऱ्या १३ वाड्याना शेतीसाठी पाणी देण्याच्या वचनपूर्ती बद्दल देवेंद्र फडणवीस व जयकुमार गोरे या़च्या आभाराच्या वरकुटे मलवडीत आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, सोनिया गोरे, बाळासाहेब जगताप, ओबीसी मोर्चा अध्यक्ष करण पोरे,सतीश काटकर, सचिन होनमाने, माजी नगराध्यक्ष विजय धट, सिध्दार्थ गुंडगे,अकिल काझी, प्रशांत गोरड, आनंदराव खरात, रामभाऊ नरळे, गावोगावचे सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आ. गोरे पुढे म्हणाले, हा खरतर सत्काराचा कार्यक्रम नसून कृतज्ञता सोहळा आहे कि ज्या नेत्याने आजपर्यंत कधी घडले नव्हते व भविष्यातही कधी घडणार नाही असा कृष्णा खोरे लवादाने घेतलेला निर्णय कोणाला बदलने शक्य नव्हते तो निर्णय बदलुन कृष्णा खोरे पाण्याचे फेर वाटप करण्याचा निर्णय घेतला आजपर्यंत आपल्या जिल्ह्यातील पाणी परजिल्ह्यात जात होते. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही असा इशारा सर्वप्रथम आपण दिला होता. विखळ्याच्या पाणी परिषदेत मी भागातील जनतेला पाणी देण्याचा शब्द दिला होता.’पाणी देणारा पक्ष तो आपला पक्ष’असे मानून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला होता. ३२ गावाना टेंभूचे पाणी देण्याची आग्रही भूमिका घेतली होती. त्यांनी २०१९ साली या भागाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. आता पाण्याच्या फेरवाटपाचा निर्णय झाला आहे. लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यताही मिळून या योजनेचे काम सुरु होईल. माजी आयुक्तांनी आजपर्यंत पाण्याची मागणी करणारे एकही पत्र दिले नाही. सत्तेतून पायउतार झाल्यावर ज्यांनी आपल्याला पाणी न देता फक्त झुलवत ठेवले त्या पवारांना एक पत्र देण्याचे नाटक केले होते. घरे फोडणारे पाठीराखे असणाऱ्या विद्वान माजी आयुक्तांनी सत्तेच्या अडिच वर्षांच्या काळात एक योजना आणली नाही कि एक रुपयाचे विकासकाम केले नाही. याला निष्क्रियता म्हणतात. मी आमदार झाल्यापासून मतदारसंघात दहा वर्षे झाली उरमोडीच्या पाण्याचा कॅनॉल वहातोय. गावे पक्क्या रस्त्यांनी जोडली आहेत. एका वर्षात ३५० कोटींचे रस्ते मंजूर करुन आणलेत. शेकडो कोटींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामे सुरु आहेत. जिहेकठापूर योजना पूर्णत्वाला जात आहे. तारळीचे पाणी येत आहे. एमआयडिसी उभी रहात आहे. ऊसासह बागायती शेती होत आहे. मतदारसंघात कारखान्यांची धुराडी पेटली आहेत तरीही प्रत्येक रुपया बेईमानी करुन कमवणारे आणि गुगलने सर्वाधिक भ्रष्टाचारी ठरवलेले माजी आयुक्त मला निष्क्रिय म्हणतात यावरुन ते किती विद्वान आहेत हे समजते. ठरलयवाल्यांचा एका झटक्यात कार्यक्रम करुन त्यांना घरी पाठवले आहे. फलटणकरांच्या छाताडावर खासदार बसवून तीन वेळा जनतेच्या आशिर्वादाने आमदार झालोय. माण – खटावचे भविष्य बदलण्याचे काम करताना रात्रीचा दिवस करुन परिश्रम करतोय. जनतेला पाणी देताना प्रत्येक लढाईत विरोधकांना पाणी पाजत आलोय.
आता निष्क्रिय विरोधक जागे झाले आहेत. विकासकामांचे काहीही न बोलता मतदारांना विकत घ्यायची भाषा सुरु झाली आहे. लाईटचा एक डीपी बसवायची त्यांची क्षमता नाही. सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेने त्यांची पैशाची मस्ती उतरवून त्यांना जमिनीवर आणा असे आवाहनही त्यांनी केले.
शिवाजीराव शिंदे, चिन्मय कुलकर्णी, लीनाताई कदम, प्रशांत गोरड, सचिन होनमाने, सतीश काटकर यांनी मनोगत व्यक्त केले.
चौकट …..
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना जनतेचे दु:ख समजलेच नाही …..
पायपीट करत डोक्यावरून पाण्याचा हंडा आणताना माताभगिनींना किती वेदना होतात, शेतीला पाणी नसताना शेतकऱ्यांना किती दु:ख होते, रस्ते आणि वाहतूकीच्या साधनांअभावी किती अडचणी येतात ते जयकुमारने अनुभवले आहे. ते दु:ख संपविण्याचा निर्धार करुनच राजकारण आणि समाजकारणात आलो. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना हे समजणारच नाही असा टोलाही आ. गोरे यांनी लगावला.