बिजवडी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माण विधानसभा मतदार संघामध्ये भगवा सप्ताह अभियान सुरु असून या भगव्या सप्ताहामध्ये महिलांचा उत्स्पुर्त सहभाग दिसून येत आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले व म.आ.जिल्हा संघटिका सलमा शेख यांचे प्रयत्नातून व उपस्थितीत नूतन शिवसेना शाखांची उद्घाटणेराणंद, भालवडी,वाकी म्हसवड,ढाकणी गावांच्या फलकांची उद्घाटणे व सभासद नोंदणी करणेत आली. या समारंभास शिवसेना उपनेत्या सौ.छायाताई शिंदे, माण विधानसभा संपर्क प्रमुख कृष्णा नलावडे,माण विधानसभा महिला आघाडी संपर्क प्रमुख सौ.मनिषाताई नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होते. या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी बाळासाहेब मदने तालुकाप्रमुख माण, शिवदास केवटे प्रभारी शहरप्रमुख म्हसवड, म.आ.तालुका संघटिका माण संगिता घोडके, खटाव संघटिका सत्वशिला हजारे,मन्सुरा मुलाणी उपस्थित होते.