एच एस आर पी प्लेटचे पैसे शासनाने भरावे :- संजय भोसले

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
श्रीकांत जाधव उंब्रज प्रतिनिधी

राज्य शासनाकडून एच एस आर पी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर (hsrp) प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे 31 मार्चनंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर आरटीओ विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते. दरम्यान (HSRP,,) नंबर प्लेटचे पैसे संबंधित विभाग व शासनाने भरावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख संजय भोसले यांनी संबंधित विभागाकडे प्रसिद्ध पत्रका द्वारे केली आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,
संबंधित नंबर प्लेट सन २०१९ च्या अगोदर च्या वाहनांना पैसे घेऊन नंबर प्लेट दिल्या जाणार आहेत. तरी त्यावेळी वाहने घेताना संबंधित वाहनांचा वण टाइम रोड टॅक्स, व इतर दंडात्मक कारवाईंमधून जे पैसे शासनाकडे जमा झाले आहेत, त्या पैशातून संबंधित वाहनांना नंबर प्लेट द्याव्यात. तसेच दोन ते तीन महिन्याच्या मुदती ऐवजी कमीत कमी एक वर्षाची मुदत वाढ करण्यात यावी कारण वाहनांची संख्या पाहून शासनाने आपला निर्णय बदलावा अन्यथा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल त्याची सर्व जबाबदारी संबंधित विभाग व शासनाची राहील. कारण या शासन निर्णयामुळे सर्व वाहनधारकांमध्ये नाराजी आहे याची दखल संबंधित विभागाने घ्यावी व त्याचबरोबर शासनाने सुद्धा घ्यावी अशी माहिती कराड उत्तर तालुकाप्रमुख संजय भोसले यांनी प्रसिद्धी पत्र काढून दिली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!