जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिंडवाडी केंद्र वडजल ता.माण येथे माता पालक गट व विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला निमित्त होते वृक्षारोपण व त्यांचे संगोपन
याबाबत सविस्तर वृत्त असे जि.प.शाळा खिंडवाडी येथे माता पालक गटातील मातांनी शाळेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शालेय आवार स्वच्छ केले व शालेय परिसरात वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे आंबा,रामफळ,नारळ, गुलमोहर, करंज त्याच बरोबर शालेय परस बागेत कडीपत्ता, टोमॅटो, मिरची, वांगी, कोथिंबीर यांची लागवड करुन त्यांचे संगोपन केले आहे याचा उपयोग दररोजच्या शालेय पोषण आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना व माता पालक गटातील मातांनी अत्यंत कौशल्याने संगोपन केल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भारती जाधव व उपशिक्षक श्री रमेश शिंदे यांनी माता पालक गटातील मातांना पर्स व जेवणाचे स्टिलचे डबे देवुन यथोचित सन्मान करण्यात आला त्याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांना देखील स्कूल बॅग व जेवणाचे स्टिलचे डबे देवुन यथोचित सन्मान करण्यात आला
सदर कार्यक्रमास गावचे पोलिस पाटील श्री नरळे, शिक्षणप्रेमी नागरिक डॉ नयना नरळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ उज्वला शिंदे, उपाध्यक्ष सर्व सदस्य पालक उपस्थित होते.
सदर शाळेमध्ये संगीतमय परिपाठ व भविष्यवेधी विद्यार्थी घडविण्यासाठी रोज वर्तमानपत्र वाचन यांसारखे अनेक उपक्रम राबविले जातात
उपस्थितांचे स्वागत सौ भारती जाधव यांनी केले तर कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी श्री रमेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.