“प्रभाग ४ मधून मा. सचिन लोहार यांनाच उमेदवारी मिळावी” — नागरिकांची एकमुखी मागणी

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड / प्रतिनिधी

म्हसवड नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. ४ मधून नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे — “आमचा नगरसेवक फक्त सचिन लोहारच!”
विधाता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि तरुण समाजसेवक मा. श्री सचिन लोहार यांना नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवारी मिळावी, अशी मागणी नागरिक, व्यावसायिक, शिक्षक, वारकरी मंडळे आणि विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून सचिन लोहार यांनी आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून प्रभाग ४ मधील जनतेच्या मनात खोलवर स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याचा विस्तार केवळ म्हसवड शहरापुरता मर्यादित नसून संपूर्ण परिसरात त्यांचे सामाजिक कार्य झळकत आहे.

नागरिकांच्या मनातील विश्वास

   “सचिनभाऊ नेहमी लोकांसाठी धावून येतात. एखाद्या घरात आजार असो, शाळेत एखादा कार्यक्रम असो किंवा रस्त्यावर अडचण असो, ते स्वतः पुढाकार घेतात. त्यांच्यात नेता म्हणून असलेले गुण आणि समाजासाठीची तळमळ पाहता उमेदवारी त्यांनाच मिळायला हवी.”

समाजकारणातून घडलेले नाव

      विधाता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वारकऱ्यांना नाश्ता, आरोग्य शिबिरे, अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमा, गरीब विद्यार्थ्यांना कपडे व शैक्षणिक साहित्य वाटप, रस्ता सुरक्षा जनजागृती आणि पर्यावरण रक्षण उपक्रम — या सर्व उपक्रमांत सचिन लोहार यांनी स्वतःचे योगदान दिले आहे.

     त्यांच्या प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेमुळे युवकवर्गही त्यांच्या पाठीशी उभा आहे.

 “सचिनभाऊ हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी सत्ता नव्हे, सेवा निवडली आहे,” असे मत प्रभागातील अनेक युवकांनी व्यक्त केले.

 

शहरासाठी केलेले ठोस काम

       म्हसवडमधील लाईटबिल दुरुस्ती केंद्राची मागणी, स्वच्छतागृह दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सोय, फाडकाम गृहाची मागणी — या सर्व प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

Oplus_16908288

नागरिकांची मागणी स्पष्ट आता नागरिकांचा सूर एकच —

    “अशा कष्टाळू, प्रामाणिक आणि समाजाशी जोडलेल्या व्यक्तीला नगरसेवक पदाची उमेदवारी मिळालीच पाहिजे.”

शहरात आज सर्वत्र “सचिन लोहार नगरसेवक व्हावा” या आशेने चर्चा सुरू आहे.
त्यांचा साधेपणा, सेवाभाव आणि संवेदनशील दृष्टिकोन पाहता नागरिकांचा विश्वास ठाम आहे —

म्हसवडकर मतदारांचा सुशिक्षित, प्रामाणिक आणि समाजसेवक व्यक्तिमत्वाकडे ओढा

“प्रभाग ४ साठी योग्य उमेदवार म्हणजे फक्त मा. श्री सचिन लोहार!”

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *