मा. ना. जयकुमार गोरे यांचे हस्ते जनश्री फाउंडेशन, म्हसवड यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

बातमी Share करा:

 

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड

सालाबाद प्रमाणे जनश्री फाउंडेशन, म्हसवड यांच्या वतीने दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या दिनदर्शिकेचे यंदा मा. ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते व उद्योजक संजयकाका गांधी,प्रांताधिकारी श्रीमती गाडेकर मॅडम फाउंडेशन अध्यक्ष इंजि सुनील पोरे यांचे प्रमुख उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला मान्यवरांचा मोठा प्रतिसाद लाभला.

दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक नेते, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. या वेळी ना. जयकुमार गोरे यांनी जनश्री फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. त्यांनी संस्थेच्या उपक्रमांबद्दल प्रशंसा व्यक्त करत म्हटले की, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो.
कार्यक्रमात जनश्री फाउंडेशनच्या करणभैय्या पोरे यांनी संस्थेच्या पुढील उपक्रमांची माहिती देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या प्रकाशन सोहळ्यात जनश्री फाउंडेशनचे सदस्य, कार्यकर्ते, आणि स्थानिक नागरिकांचीही लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अँड शुभम पोरे यांनी प्रयत्न केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!