सामाजिक सेवेचे व्रत जपत दि.१३ व १४ जानेवारी रोजी इंडिया झिंदाबाद (आय.झेड) फ्रेण्डस ग्रुप रायगड वतीने “आठवणींचा हिंदोळा”कार्यक्रम म्हसळा तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.मंडळाचे अध्यक्ष रमेश थवई यांचे अध्यक्षतेखाली म्हसळे तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग,मांदाटणे गाव आणि ताम्हणेशिर्के येथील ग्रामस्थ मंडळा करिता एकुण ४५ खुर्च्या मोफत देण्यात आल्या.जिल्हा परिषद मांदाटणे शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना शैक्षणिक व स्वच्छता विषयक वस्तूंचा संच भेट देण्यात आला.
कार्यक्रमाच्या नियोजीत सत्रात देहेन गावी -गावकी पध्दत’ विषयावर राकेश पाटील यांचे अध्यक्षतेत चर्चासत्र संपन्न झाले.चर्चासत्रात कोकणात गावकी पध्दत सुरू आहे या पध्दतींमुळे गावाची एकी,शांती टिकून आहे.गावकी मुळे गावाच्या समस्या सोडवण्या साठी न्यायव्यवस्थे साठी नक्कीच हातभार लागतो असे मत उरण कोमसापचे शाखाध्यक्ष मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी व्यक्त केले.दुस-या सत्रात रायगड जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदु शिर्के यांचे अध्यक्षतेखाली आठवणींचा हिंदोळा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात १९८५ पासून म्हसळे तालुक्यात कार्य सेवा केलेल्या आणि आता अन्य ठिकाणी सेवेत असणाऱ्या कर्मचा-यांनी आपल्या आठवणी,अनुभव विषद केले.
मंडळाचे सदस्य नरेश सावंत यांची अलिबाग शिक्षक पतपेढी चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आणि नंदु शिर्के यांची रायगड जिल्हा शिवसेना(उबाठा गट)उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला पेण शिक्षक पतपेढीचे संचालक रवी पाटील,सुबोध पाटील,शिक्षण विभाग प्रतिनिधी नरेश विचारे,हेमंत माळी,केंद्रप्रमुख महादेव पवार,बशीर उलडे,अरविंद मोरे,इकबाल कौचाली,मांदाटणे गाव तंटामुक्ती अध्यक्ष अनंत पवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रज्ञा वाघरे,किसन शिंदे,रामचंद्र धोकटे,प्रदिप पवार,महादेव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र पाटील,शंकर काथारा,सुबोध पाटील,संजय पाटील यांनी अथक प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खडस यांनी केले.