आत्मगिरी विद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड:-
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथील आत्मगिरी माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हिंदी दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात हिंदी पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.विश्वंभर बाबर,संस्थेच्या सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर , प्राचार्य राहुल फुटाणे,विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल माने या सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने संकुलातील सहशिक्षिका रिजवाना मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिनाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना म्हणाल्या दरवर्षी १४ सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संविधान सभेने एक मताने निर्णय घेतला की हिंदी ही आपली भारताची राष्ट्रभाषा असणार. आज स्पॅनिश आणि इंग्रजी नंतर सर्वाधिक बोलली जाणारी जगातील चौथी भाषा हिंदी आहे.सरकारी पातळीवर कामकाज करताना हिंदी भाषेला विशेष महत्व आहे.वर्षातून एक दिवस सर्वांनी हिंदी भाषेचा वापर केला तर हिंदी भाषेचा विकास होईल आणि सर्वाना महत्व कळेल असा हिंदी दिवस साजरा करण्यामागे मुख्य उद्देश होता.आपली राष्ट्रभााषेचा आपल्याला अभिमान हवा, हिंदी राष्ट्रभाषा ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे त्या साठी हिंदी दिवस साजरा केला जातो. रोजच्या जीवनात हिंदी भाषेपेक्षा इंग्रजी भाषेचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. यासाठी सर्वाना हिंदी भाषेचे महत्व समजणे अत्यंत गरजेचे आहे. आपली राष्ट्रभाषा ही विश्वभाषा बनली पाहिजे असे आवाहन केले.या निमित्ताने विद्यालयात विविध हिंदी कविता, हास्यव्यंग करुन विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.विद्यालयातील नम्रता तावरे,स्मिता कालढोणे,सृष्टी गोंजारी,आर्या शिंदे,श्रेया खांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया लोखंडे व वैष्णवी उचाळे यांनी केले तर आभार वैष्णवी माने हिने मानले.