बहुचर्चित हेडाम  कादंबरी पोहचली सातासमुद्रापार..

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक ;अहमद मुल्ला )
म्हसवड 
हेडाम ह्या बहुचर्चित कादंबरीची भारता बाहेर  मागणी वाढली आहे .सुप्रिया किसन  वाळीबे यां भारतीय वंशाच्या व्यासंगी वाचक यांनी कॅनडातुन कादंबरीची मागणी केली होती.  काल हेडाम कादंबरी कॅनडा देशात विमानाने पोहचली आहे .तसेच  अरबीयन राष्ट्रात  *ओमन*   देशात  आंतरराष्ट्रीय राजदुत जयपाल डेथे IFS याच्या मार्फत पोहचली आहे.
          नागु विरकर लिखीत हेडाम ह्या नुकतीच प्रकाशीत झालेल्या बहुचर्चित कादंबरीस आल्पावधीतचं शिवानी प्रकाशन तर्फे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार भेटला आहे.
        तर धनगर प्रतिष्ठान ठाणे याच्या वतीने 28 मे 2023 रोजी साहित्य पुरस्कार दिला जाणार आहे. मुक्त सृजन पत्रिका संभाजीनगर तर्फे राज्यस्तरीय साहित्य क्षेत्रातील विशेष पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
         हेडाम ह्या कादंबरीचा वाचक वर्ग देशात व विदेशात वाढत असून चिकित्सक  प्रतीक्रिया लेखी, तोंडी भ्रमणध्वनिवून येत आहेत. हेडामची मागणी दिवसेन दिवस वाढत असून दुसरी आवृत्ती संपत आली आहे…
         भारतातून कॅनडात गेलेल्या व्यवसायी वर्ग उच्चशिक्षणास गेलेले   तरूण यांनी हेडाम च्या दहा प्रती आजून मागणी केली आहे.हेडाम देशात विदेशात पोहचलयामुळे साहित्य वर्तुळात चर्चा सुरू आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!