दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष) इंजबाव तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवड येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले.
मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे सर, मा. जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मिथुन पवार सर,मा.तालुका आरोग्य अधिकारी (माण) डॉ.लक्ष्मण कोडलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले. सदर शिबिराकरिता स्त्रीरोगतज्ञ आयुर्वेदाचार्य डॉ. अजित गायकवाड, पंचकर्मतज्ञ आयुर्वेदाचार्य डॉ. सेजल मोडासे, प्रा आ केंद्र,म्हसवड चे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कुलकर्णी, प्रा आ केंद्र पुळकोटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा बुरुंगले, आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष) इंजबाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ.भरत काकडे, प्रशिक्षणार्थी डॉ. विश्वजीत मोरे, डॉ. संतोष येलपले, नेत्र चिकित्सा अधिकारी प्रज्ञा क्षीरसागर, योग प्रशिक्षक श्री.जगन्नाथ लोहार उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये योग्य दिनचर्या, ऋतुचर्या तसेच योगासनांबद्दल ज्येष्ठ नागरिकांना माहिती देण्यात आली. रक्तदाब,मधुमेह,तोंडाचा,महिलांमध्ये स्तनांचा व गर्भाशयाचा कर्करोग या आजारांची तपासणी करून त्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.सर्व रुग्णांना आयुर्वेदिक औषधी वनस्पती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.नेत्र रोगाचे 35 रुग्ण तपासण्यात आले.त्यामध्ये मोतीबिंदूच्या 7 रुग्णांचे निदान करून त्यांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. सदर सर्वरोगनिदान शिबिरात परिसरातून 165 वयोवृद्ध रुग्णांनी उपचार घेतले.