एच डी. एफ. सी. बँक म्हसवड शाखेत सुवर्ण तारण योजनेचा शुभारंभ इंजि. सुनील पोरे यांचे हस्ते संपन्न
म्हसवड : दुष्काळी माण तालुक्यातील बँक ग्राहकाचे सोईसाठी अडचणी वेळी तातडीची व हक्काची मदत मिळावी या उद्देशाने म्हसवड येथील (एच डी. एफ सी बँकेच्या शाखेत आज मंगलवार दि. 20/12/22 रोजी सुवर्ण तारण योजनेचा शुभारंभ म्हसवड येथील शुभम उद्योग समूहाचे सर्वेसर्वा इंजि. सुनील पोरे यांचेहस्ते संपन्न झाला ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध केले बद्दल बँकेस सुनील पोरे यांनी धन्यावाद दिले तर या सुविधेबद्दल माहिती देताना ब्रँच मॅनेजर- अमित कुमार यांनी सांगितले की (एकदा ग्राहक सुवर्णतारण योजनेचा लाभ घेणेसाठी बँकेत आला तर तेथेच त्याचे दागिण्याचे मुल्याकन करून तात्कळ रक्कम घेऊनच ग्राहक बाहरे जाईल त्यास इकडे-तिकडे जाण्याची आवश्यकता लागणार नाही या सुविधेचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन केले
कार्यक्रमाकरीता सर्कल हेड समीर कुलकर्णी सुर्वणतारण मॅनेजर विठ्ठल काळेल, अमोल शिंदे, अनिलशेठ व्होरा, अभिजित घट, व्हॅल्युएटर वेदपाठक, कर्मचारीवृंद उपस्थित होते.